Rohit Shetty Home Firing Case Saam tv
मनोरंजन बातम्या

Rohit Shetty Home Firing Case: रोहित शेट्टीच्या घरावर फायरिंग प्रकरणात मोठी कारवाई; वाँटेड आरोपीला आग्र्यातून अटक

Rohit Shetty Home Firing case: रोहित शेट्टीच्या घरावरील फायरिंग प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. फरार वाँटेड आरोपीला आग्र्यातून अटक केली. तपासाला वेग आला असून प्रकरणात नवे धागेदोरे समोर येत आहेत.

Shruti Vilas Kadam

संजय गडदे, साम टिव्ही

Rohit Shetty Home Firing case: प्रसिद्ध बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराजवळ झालेल्या फायरिंग प्रकरणात मोठी कारवाई करत मुंबई पोलिसांनी एक महत्त्वाचा वाँटेड आरोपी अटक केला आहे. उत्तर प्रदेशातील आग्रा येथून प्रदीपकुमार रामसिंह उर्फ ‘गट्टू’ उर्फ ‘छोटू’ याला ताब्यात घेण्यात आले.

मुंबई पोलिसांच्या विशेष पथकाने उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सच्या मदतीने ही कारवाई केली. आरोपीला ट्रान्झिट रिमांडवर मुंबईत आणण्यात येत असून पुढील चौकशीसाठी त्याला गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले आहे. 31 जानेवारीच्या रात्री उशिरा रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील घराजवळ अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला होता. या घटनेत कोणीही जखमी झाले नव्हते, मात्र परिसरात मोठी भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासात उघड झालेले धागेदोरे

तपासादरम्यान हे प्रकरण खंडणीसाठी रचलेला कट असल्याचे समोर आले. मुख्य सूत्रधार शुभम लोणकर याने सोशल मीडियावरील पोस्ट पाहून प्रदीपकुमारला आपल्या टोळीत सामील करून घेतले होते. रोहित शेट्टी यांच्या घराजवळ फायरिंग करून बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करणे आणि त्यानंतर कोट्यवधी रुपयांची खंडणी उकळण्याचा त्यांचा प्लॅन होता.या टोळीत अनेक तरुणांना सामील करून त्यांना मोठ्या पैशांचे आमिष दाखवण्यात आले होते. प्रदीपकुमारही त्याच टोळीचा भाग होता.

या प्रकरणात यापूर्वीच मुंबई पोलिसांनी हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पुणे येथून मुख्य शूटरसह सात जणांना अटक केली आहे. पुण्यातून स्वप्निल बंडू सकटे, समर्थ शिवशरण पोमाजी, सिद्धार्थ दीपक येनपुरे आणि आदित्य ज्ञानेश्वर गायकवाड यांना अटक करण्यात आली होती.

प्रदीपकुमार गेल्या चार महिन्यांपासून फरार होता आणि सतत पोलिसांना चकवा देत होता. अखेर तो आग्रा येथील घरी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले. अटक केलेल्या आरोपीला न्यायालयात हजर करून अधिक पोलीस कोठडी मागितली जाणार आहे. त्याच्या चौकशीतून या कटामागील आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नाशिकच्या TCS प्रकरणातील संशयित महिला आरोपी निदा खान गरोदर असल्याची माहिती

Rohit Sharma: असंभव!!! श्रेयस अय्यरचा सुपरमॅन कॅच पाहून सूर्या-रोहितही थक्क; आयपीएलच्या इतिहासातील खतरनाक झेल

हार्ट अटॅक येण्यापूर्वी १ महिना आधी शरीर देतं 'हे' संकेत; बिलकूल दुर्लक्ष करू नका

New Labour Code: नवीन कामगार कायद्यात महत्त्वाचा बदल; ग्रॅच्युटी वाढणार पण कर्मचाऱ्यांना बसणार मोठा फटका

Baseer Ali Controversy: 'बिग बॉस' फेम अभिनेत्याचे सोशल मीडिया अकांऊट हॅक; अभिनेत्याने 'त्या' पोस्टबाबत केला खुलासा

SCROLL FOR NEXT