Pandharpur, marathi movie aham saam tv
मनोरंजन बातम्या

No Screens For Marathi Movie : बा विठ्ठला, मराठी चित्रपटांना थिएटर मिळू दे, निर्मात्यासह कलाकारांचे पंढरीत साकडं

बाळंतणी पेक्षा मुल मोठं अशी अवस्था झालीय आमची मराठी चित्रपट निर्मात्याची खंत

भारत नागणे

Pandharpur News : मराठी चित्रपटांना महाराष्ट्रातच थिएटर मिळत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मराठीचा ठेंबा मिरवणा-या राज्य सरकार आणि राजकीय पक्षांचे हे अपयश असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे. मराठी चित्रपटाला थिएटरमध्ये स्क्रीन मिळावी यासाठी चक्कं मराठी चित्रपटाच्या एका निर्मात्याने व चित्रपटातील कलाकारांनी पंढरीच्या विठुरायालाच साकडे घातले आहे. (Maharashtra News)

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील अमीर शेख यांनी अत्यंत कष्टाने 'अहम' हा मराठी चित्रपट तयार केला आहे. चित्रपट तयार होऊन जळपास सहा महिने उलटून गेले आहेत. चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी थिएटर मिळत नसल्याने निर्माता आणि कलाकार हतबल झाले आहेत.

अमीर शेख आणि कलाकारांनी सरकारचे लक्ष वेधून‌ घेण्यासाठी आंदोलन‌ही केले . त्यानंरही ना सरकारने ना मराठी भाषेचा ठेंबा मिरवणा-या कोणत्या ही राजकीय पक्षाने त्यांची दखल‌ घेतली नाही.

हिंदी चित्रपटांना शेअरिंग पध्दतीने थिएटर उपलब्ध करून दिली जातात. मात्र दुसरीकडे‌‌ मराठी चित्रपटांना टक्के वारीवर थिएटर दिली‌ जातात. त्यामुळे ''बाळंतणी पेक्षा मुल मोठं,, अशी अवस्था मराठी चित्रपट निर्मात्यांची अवस्था झाली आहे. हिंदी चित्रपटाप्रमाणेच मराठी चित्रपटांना शेअरिंग पध्दतीने थिएटर मिळावेत अशी‌ मागणी ही शेख यांनी केली आहे.

राज्य सरकारने (maharashtra government) मराठी चित्रपटांसाठी वर्षातून‌ चार आठवडे थिएटर उपलब्ध करून देण्याच्या सूचना मालकांना‌ दिल्या आहेत. सूचनांचे पालन न करणाऱ्या मालकांना दहा लाख दंडाची तरतूद ही केली आहे. राज्य सरकारने हा कालावधी वाढवून तो दररोज दोन शो देण्यासाठी नवीन आदेश काढावेत अशी मागणीही शेख यांनी केली आहे.

या संदर्भात राज्य सरकारकडे व राजकीय नेत्यांचे उंबरठे झीजवून देखील अद्याप दखल घेतली नाही. त्यामुळे अमीर शेख आणि त्यांच्या कलाकारांनी ''बा विठ्ठला (vitthal) मराठी चित्रपटांना थिएटर मिळू दे ‌असं साकडं घातल्याचे अहम चित्रपटाचे निर्माते अमीर शेख यांनी सांगितले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Stone Pelting: जळगाव ईद मिरवणुकीदरम्यान दोन गटात दगडफेक

TikTok भारतात पुन्हा सुरू होणार का? खुद्द मोदी सरकारमधील मंत्र्यानं दिली नेमकी माहिती

Latkan designs for Blouse: ब्लाउजच्या ट्रेंडी डिझाईनसाठी हे लटकन ट्राय करा, मिळेल एक क्लासी लूक

OBC Protest: मराठा आरक्षण GR विरोधात ओबीसी आक्रमक, भुजबळांनीही दिलं सरकारला आव्हान

Maharashtra Tourism: लोणावळा, माथेरान विसराल; महाराष्ट्रातील 'हे' स्वर्गाहूनी सुंदर हिल स्टेशन, कधी पाहिलंत का?

SCROLL FOR NEXT