Navjyot Bandiwadekar SAAM TV
मनोरंजन बातम्या

Navjyot Bandiwadekar : दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर यांचे अनोखे बर्थडे सेलिब्रेशन पाहिलेत का? पाहा PHOTOS

Navjyot Bandiwadekar Special Birthday Party : दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर यांनी एका खास पद्धतीने आपला वाढदिवस सेलिब्रेट केला आहे. बर्थडे पार्टीच्या थीमने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. सुंदर थीमचे फोटो पाहा.

Shreya Maskar

प्रसिद्ध दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर (Navjyot Bandiwadekar) ज्यांनी आपल्या पहिल्याच चित्रपटात 'घरात गणपती' द्वारे प्रेक्षकांच्या मनावर गारूड केले, त्यांनी आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. HBO च्या लोकप्रिय सीरिज 'द व्हाइट लोटस' पासून (The White Lotus) प्रेरित हा भव्य थीम-पार्टीचा सोहळा पाहुण्यांना थेट या मालिकेच्या समृद्ध, विलासी आणि ट्रॉपिकल जगात घेऊन गेला.

एका आलिशान हाय-राईज रूफटॉपवर रंगलेल्या या सोहळ्यात सिनेमॅटिक भव्यता आणि वास्तवातील ऐश्वर्य यांचा अनोखा अंदाज दिसून आला. सजावट, खास थीमवर आधारित कॉकटेल्स आणि मालिकेतील पात्रांप्रमाणे ड्रेस कोड, यामुळे संपूर्ण वातावरण 'द व्हाइट लोटस'च्या जगात हरवून जाण्यासारखं वाटत होतं. पाहुण्यांनीही मालिकेतील पात्रांप्रमाणे भव्य रिसॉर्ट लूक आणि उत्साही व्यक्तिमत्त्व साकारून थीममध्ये रंग भरले.

नवज्योत बांदिवडेकर ज्यांनी आपल्या पुरस्कार विजेत्या पहिल्याच चित्रपटाने इंडस्ट्रीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांना बारकाव्यांकडे विशेष लक्ष देण्याची सवय आहे आणि याची झलक त्यांच्या वाढदिवसाच्या सोहळ्यातही दिसून आली. 'घरात गणपती' या चित्रपटाने त्यांना 'सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शकासाठी IFFI 2024 पुरस्कार' मिळवून दिला. 'घरात गणपती' हा चित्रपट गेल्या वर्षातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या मराठी चित्रपटांपैकी हा एक ठरला.

मात्र 'द व्हाइट लोटस' सीरिजमधील नाट्यमय ट्विस्ट्सच्या तुलनेत या रात्रीत कोणताही ड्रामा नव्हता. फक्त उत्तम सोबत, छान संगीत आणि एखाद्या सिनेमातील स्वप्नवत क्षणांसारखे वातावरण होते. फिल्म मेकिंग सारख्याच त्यांच्या उत्कृष्ट सृजनशीलतेचा प्रत्यय या पार्टीतही आला. कारण नवज्योत बांदिवडेकर फक्त सिनेमाच्या पडद्यावरच नव्हे तर प्रत्यक्षातही एक परिपूर्ण सेट तयार करतात.

या खास सोहळ्यासाठी महेश मांजरेकर, अनुषा दांडेकर, सुनील बर्वे, अभिजीत खांडकेकर, सुखदा खांडकेकर आणि इंडस्ट्रीतील अनेक नामवंत मंडळी उपस्थित होती. वातावरण आलिशान असतानाही तितकंच उत्स्फूर्त होते. गप्पा, हशा आणि खास थीम असलेले पेय यांची रेलचेल होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT