Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन टॅक्स भरण्यातही शहेनशाह, शाहरुख-सलमानलाही टाकलं मागे

Amitabh Bachchan India Highest Taxpayers : बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी 2024-2025 या आर्थिक वर्षात सर्वाधिक कर भरला आहे. त्यांनी शाहरुख खानलाही मागे टाकले आहे. बिग बींनी किती कोटींचा कर भरला, जाणून घेऊयात.
Amitabh Bachchan India Highest Taxpayers
Amitabh BachchanSAAM TV
Published On

बॉलिवूडचे बिग बी कायम त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. त्यांनी आजवर अनेक हिट चित्रपटात काम करून चाहत्यांना भुरळ घातली आहे. अलिकडेच अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) 'कल्की एडी 2898' चित्रपटात पाहायला मिळाले होते. 2024 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी 'कल्की एडी 2898' समावेश होता. आता मात्र अमिताभ बच्चन एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांनी 2024-2025 या आर्थिक वर्षात तब्बल 120 कोटी रुपये कर (Amitabh Bachchan India Highest Taxpayers) भरला आहे. अमिताभ बच्चन यांची एकूण कमाई 350 कोटी रुपये होती. त्यांनी चित्रपट, जाहिराती, ब्रँड एंडोर्समेंट्स यांनमधून बक्कळ कमाई केली. तसेच त्यांनी 'कौन बनेगा करोडपती' हा शो देखील होस्ट करून कमाई केली आहे. 82 वर्षांचे अमिताभ बच्चन सिनेविश्वात सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांपैकी एक ठरले आहेत.

दुसरीकडे अमिताभ बच्चन यांनी 15 मार्च 2025 रोजी 2024-2025 या आर्थिक वर्षातील शेवटची ॲडव्हान्स टॅक्स इन्स्टॉलमेंट म्हणून तब्बल 52.50 लाख रुपये भरले.

शाहरुख खानला टाकलं मागे

गेल्या वर्षी शाहरुखने 92 कोटी रुपये रुपयांचा टॅक्स भरला होता. मात्र आता यावर्षी अमिताभ बच्चन यांनी 120 कोटी रुपयांचा टॅक्स भरून शाहरुख खानला मागे टाकले आहे. अमिताभ बच्चन यांनी शाहरुख खानपेक्षा 30% जास्त कर भरला.

अमिताभ बच्चन यांना चित्रपटांसोबतच 'कौन बनेगा करोडपती' साठी ओळखले जाते. त्यांनी आजवर 'कौन बनेगा करोडपती' या धमाकेदार रिअ‍ॅलिटी शोचे होस्टिंग केले आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर अमिताभ बच्चन नवीन सीझनचे होस्टिंग करणार नसल्याच्या चर्चा पाहायला मिळत आहे. अमिताभ बच्चनचे चाहते त्यांच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Amitabh Bachchan India Highest Taxpayers
John Abraham : ब्लॅक कलर अन् कस्टमाइज्ड फिचर; जॉन अब्राहमने खरेदी केली आलिशान कार, किंमत वाचून पायाखालची जमीन सरकेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com