Shahid Afridi : शाहीद आफ्रिदी मला धर्मांतर कर म्हणायचा, पाकिस्तान टीममधल्या हिंदू क्रिकेटपटूचं विधान चर्चेत

Pakistan Cricket Team : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरियाच्या विधानाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. पाकिस्तानच्या टीममध्ये हिंदू-मुसलमान असा भेदभाव होत असल्याचे कनेरियाने म्हटले आहे.
Shahid Afridi
Shahid AfridiSaam Tv
Published On

Shahid Afridi Pakistan : चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे होते. पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभव झाल्यानंतर पाकिस्तानचा संघ स्पर्धेबाहेर गेला. या लाजिरवाण्या विक्रमामुळे सर्वत्र पाकिस्तानच्या संघावर टीका सुरु होती. अशातच पाकिस्तान संघातल्या एका हिंदू क्रिकेटपटूने केलेल्या वक्तव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया सध्या अमेरिकेत आहे. एका कार्यक्रमामध्ये त्याने पाकिस्तानकडून खेळत असताना झालेल्या भेदभावावर भाष्य केले. त्याने शाहीद आफ्रिदीवर अनेक आरोप केले. अमेरिकेतल्या वॉशिंग्टनमधील कार्यक्रमात ANI शी संवाद साधताना 'मला शाहीद आफ्रिदीने अनेकदा धर्मांतर करण्याचा सल्ला दिला', दानिश कनेरियाने म्हटले.

'शाहीद आफ्रिदी आणि अनेक पाकिस्तानी क्रिकेटपटू मला नेहमी त्रास द्यायचे. ते माझ्यासोबत जेवायला बसयाचे नाही. शाहीद आफ्रिदीने अनेकदा धर्म परिवर्तन कर असे म्हटले होते. पाकिस्तानच्या संघात मला त्रास देण्यात आला. फक्त इंजमाम उल हक माझ्याशी चांगले वागायचे. त्यांनी मला कधीही वाईट वागणूक दिली नाही', असे दानिश कनेरिया म्हणाला.

Shahid Afridi
'...गर्व है', युजवेंद्र चहलसोबतच्या डेटिंगच्या चर्चांदरम्यान RJ महावशच्या 'त्या' पोस्टनं वेधलं लक्ष, पाहा PHOTO

अनिल दलपत यांच्यानंतर दानिश कनेरिया हा पाकिस्तानमधला दुसरा हिंदू क्रिकेटपटू होता. त्याने २०२३ मध्ये एका मुलाखतीमध्येही पाकिस्तान टीममध्ये होणाऱ्या हिंदू-मुसलमान भेदभावावर वक्तव्य केले होते. २०१२ मध्ये दानिश कनेरियावर स्पॉट फिक्सिंगचे आरोप लागले. आयसीसीद्वारे त्याच्या क्रिकेट खेळण्यावर आजीवन बंदी घालण्यात आली.

Shahid Afridi
IPL 2025 : आयपीएलच्या 18 व्या सीझनमधील सर्व संघांच्या खेळाडूंची यादी एका क्लिकवर..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com