Imtiaz Ali SAAM TV
मनोरंजन बातम्या

Imtiaz Ali : शाहिद-करीना एकत्र, 'जब वी मेट २' येणार? इम्तियाज अली म्हणाले...

Jab We Met 2 : 'आयफा पुरस्कार 2025' सोहळ्याला शाहिद कपूर आणि करीना कपूर एकत्र पाहायला मिळाले. त्यांच्या भेटीनंतर सध्या सर्वत्र 'जब वी मेट २'ची चर्चा पाहायला मिळत आहे. यावर दिग्दर्शक इम्तियाज अलींनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Shreya Maskar

अलिकडेच 'आयफा पुरस्कार 2025' सोहळा पार पडला. हा सोहळा थाटात जयपूरला संपन्न झाला. या पुरस्कार सोहळ्याला अनेक मोठ्या कलाकारांनी उपस्थिती लावली. तसेच आपल्या डान्सने चाहत्यांना घायाळ केले. तर अनेक सेलिब्रेटींनी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्याचा एक खास व्हिडीओ जो आजही तुफान व्हायरल होत आहे. तो म्हणजे स्टेजवर शाहिद कपूर आणि करीना कपूर यांची झालेली भेट होय.

'आयफा पुरस्कार 2025' सोहळ्याला शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि करीना कपूर (kareena kapoor) यांची भेट झाली. दोघांनी एकमेकांशी संवाद साधला. तसेच एकमेकांना मिठी देखील मारली. दोघांनी हात देखील मिळवले. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. शाहिद आणि करीनाच्या भेटीनंतर सर्वत्र 'जब वी मेट 2' ची (Jab We Met 2) चर्चा पाहायला मिळत आहे. चाहत्यांना ही जोडी पुन्हा एकत्र पाहायची आहे. यावर 'जब वी मेट ' चे दिग्दर्शक इम्तियाज अलींनी (Imtiaz Ali) आपली प्रतिक्रिया दिली आहे.

इम्तियाज अली नेमकं काय म्हणाले ?

इम्तियाज अली म्हणाले की, "आयफा पुरस्कार सोहळ्याला शाहिद आणि करीनाला एकत्र पाहून छान वाटले. मात्र 'जब वी मेट'चा पार्ट २ म्हणजे सीक्वल बनवण्याची माझी इच्छा नाही. या चित्रपटाला मी मी तिथेच सोडू इच्छितो. कारण त्यामुळे मूळ सिनेमाची मजा खराब होऊ शकते. तसेच शाहिद आणि करीनासोबत नवा चित्रपट बनवण्याचा सध्या माझा प्लान नाही. मात्र त्यावेळी दोघांसोबत काम करून चांगले वाटले. आज आम्ही स्टेजवर भेटलो आणि पुढे देखील आम्ही भेटत राहू..."

'जब वी मेट' चित्रपट

'जब वी मेट' चित्रपट 2007 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटातील गीत आणि अंशुमन यांच्या केमिस्ट्रीने तर सिनेमाला चार चाँद लावले. या चित्रपटात शाहिद कपूर आणि करीना कपूर मुख्य भूमिकेत आहेत. शाहिद आणि करीना आधी एकमेकांना डेट करत होते. त्यांनी अनेक चित्रपट एकत्र केले आहेत. जे खूप हिट देखील झाले आहेत. खूप वर्षांनी शाहिद आणि करीनाला एकमेकांना भेटून आणि गप्पा मारून आनंद झाल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरील हास्याने दाखून दिले. या दोघांची 'जब वी मेट' चित्रपटातील केमिस्ट्री आजही चाहत्यांना भुरळ घालते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik : नाशिककरांनो पाण्याचा जपून वापर करा, शहरातील 'या' भागात आज पाणी नाही | VIDEO

Pune Traffic: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! १० नोव्हेंबरपर्यंत शहरातील वाहतुकीमध्ये मोठे बदल; पर्यायी मार्ग कोणते?

Maharashtra Live News Update: मुंडवा जमीन घोटाळ्यातील मुख्य आरोपी शीलत तेजवानी विदेशात पळून जाण्याची शक्यता

Konkan Tourism : खळखळणाऱ्या लाटा अन् थंड वाऱ्याची झुळूक, कोकणातील 'हा' समुद्रकिनारा पर्यटकांना खुणावतो

Veen Doghatli Hi Tutena: समर-स्वानंदीचा थाटच न्यारा! गोव्यात लग्न अन् मुंबईत केळवण; पाहा शाही विवाह सोहळ्याचा VIDEO

SCROLL FOR NEXT