Manasvi Choudhary
बॉलिवूडची बेबो करीना आणि सैफ त्याच्या लव्हलाईफमुळे कायमच लाईमलाईट राहतात.
'टशन' चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान करीना आणि सैफची भेट झाली. या चित्रपटाच्या सेटवरच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले.
सैफने पॅरिस येथे कुटुंबीय आणि मित्रमंडळीसमोर करीनाला प्रपोज करून जाहीरपणे आपलं प्रेम व्यक्त केलं
४ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर १६ ऑक्टोबर २०१२ मध्ये सैफ आणि करीना दोघांनीही लग्न केले.
करीना आणि सैफच्या वयामध्ये खूपच अंतर आहे. सैफ करीनापेक्षा १० वर्षांनी मोठा आहे.
करीना तिचं करिअर, सैफसोबत लग्न आणि मुलांची नावं यावरुन नेहमीच मोकळेपणाने व्यक्त होत असते. करीनाने एका मुलाखतीत 'मला वयाचा आणि धर्माचा फरक पडत नाही, मला प्रेम आदर सर्वात महत्वाचा आहे', असं सांगितलं होतं.