Dipika Kakar SAAM TV
मनोरंजन बातम्या

Dipika Kakar : दीपिकाची तब्येत आणखी बिघडली, स्टेज-2 कर्करोगाचे निदान

Dipika Kakar Health Update : टिव्ही अभिनेत्री दीपिका कक्करने सोशल मीडियावर पोस्ट करून आपले हेल्थ अपडेट दिले आहेत. ती नेमकं काय म्हणाली,जाणून घेऊयात.

Shreya Maskar

टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर (Dipika Kakar) गेल्या काही महिन्यांपासून तिच्या हेल्थमुळे चांगलीच चर्चेत आहे. अलिकडेच दीपिकाच्या नवऱ्याने शोएब इब्राहिमने दीपिकाच्या लिव्हरमध्ये टेनिस बॉलच्या आकाराचा ट्युमर असल्याची बातमी चाहत्यांना दिली होती. तसेच तिच्यावर उपचार सुरू असल्याचेही त्याने सांगितले होते. आता या संबंधित मोठी हेल्थ अपडेट दीपिकाने सोशल मीडियावर पोस्ट करून दिली आहे.

दीपिकाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने सांगितल्यानुसार तिला स्टेज-2 कर्करोग झाला आहे. ज्याच्यावर आता उपचार सुरू आहेत. तिच्या या पोस्टवर चाहते आणि कलाकारांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तिचे चाहते तिच्यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत. दीपिका कक्कर पोस्टमध्ये नेमकं काय म्हणाली, जाणून घेऊयात.

दीपिकाची पोस्ट

"तुम्हा सर्वांना माहिती आहेच की गेल्या काही आठवडे आमच्यासाठी खूप कठीण गेले आहे... पोटाच्या वरच्या भागात दुखत असल्यामुळे हॉस्पिटलमध्ये गेले होते. पण तेव्हा कळले की लिव्हरमध्ये टेनिस बॉल आकाराचा ट्यूमर आहे आणि नंतर कळले की ट्यूमर दुसऱ्या टप्प्यातील घातक (कर्करोगाचा) आहे... हा आम्ही पाहिलेल्या आणि अनुभवलेल्या सर्वात कठीण काळांपैकी एक होता. "

"मी पूर्णपणे सकारात्मक विचार करत आहे. तसेच या गोष्टीचा खंबीरपणे सामना करत आहे. माझे संपूर्ण कुटुंब माझ्या पाठीशी आहे आणि तुम्हा सर्वांचे प्रेम आणि प्रार्थना सोबत आहेत...मी यातूनही मार्ग काढेन!"

दीपिका कक्कर अलिकडेच सेलिब्रिटी मास्टरशेफमध्ये पाहायला मिळाली होती. तिने आपल्या पाककृतींना परीक्षकांना वेड लावले. मात्र तिच्या हेल्थमुळे तिला हा शो अर्ध्यावर सोडावा लागला होता. आता दीपिकाचे चाहते ती या सर्वातून लवकर बाहेर यावी यासाठी प्रार्थना करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhivtas Waterfall : पाचशे फुटांवरून झेपावणारा भिवतास वॉटर फॉल; निसर्गप्रेमींसाठी स्वर्गच!

Tejaswini Pandit: 'आई...' एवढेच उच्चारले अन् तेजस्विनी पंडित ढसाढसा रडली…; हृदय पिळवटून टाकणारा क्षण, VIEDO

केवळ चपातीच नाही तर तुम्ही गव्हाच्या पीठापासून बनवू शकता 'हे' टेस्टी फूड्स

Rahul Gandhi : मतचोरी होऊ देणार नाही, राहुल गांधी आयोगावर कडाडले

Painganga River Flood: पैनगंगा नदीला पूर, सहस्रकुंड धबधब्याने घेतले रौद्ररूप; पूरामध्ये पूल गेला वाहून, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT