बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांचे निधन झाले आहे.
वडिलांच्या निधनानंतर अभिनेत्याने भावुक पोस्ट केली आहे.
पोस्टमध्ये वडिलांचे तरुणपणीचे फोटो शेअर केले आहेत.
बॉलिवूडमधून दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता डिनो मोरियाच्या (Dino Morea) वडिलांचे दुःखद निधन झाले आहे. त्यामुळे मनोरंजसृष्टीवर शोककळा पसरली आहे. डिनो मोरियाच्या वडिलांचे नाव रॉनी मोरिया (Ronnie Morea) आहे. वडील गेल्याची माहिती अभिनेत्याने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट करून चाहत्यांना दिली आहे.
डिनो मोरियाने पोस्टमध्ये वडिलांसोबतचे जुने फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. पोस्टमध्ये रॉनी मोरिया यांचे तरुणपणीतील फोटो देखील दिसत आहे. डिनो मोरियाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याला त्याच्या वडिलांनी जीवन कसे जगायला शिकवले, याची थोडक्यात वर्णन केले आहे. पोस्टमध्ये अभिनेता खूपच भावुक झाला आहे.
"दररोज आयुष्य मनसोक्त जगा, दररोज हसा, प्रत्येक कामात उत्साह/ आवड दाखवा, व्यायाम करा, निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवा, सूर्यप्रकाश घ्या, चांगले खा, डोंगर चढा, समुद्रात पोहा, जंगलातून ट्रेकिंग करा, कठोर परिश्रम करा, चांगले वागा, दयाळू आणि प्रेमळ रहा आणि हे सर्व तुमच्या स्वतःच्या अटींवर करा!! ही यादी खूप मोठी आहे. माझ्यासाठी एक व्यक्ती जी या सर्व गोष्टींचे प्रतीक आहे - माझे मार्गदर्शक, माझे नायक, माझे वडील, बाबा!! बाबा, आयुष्यातील धड्यांसाठी धन्यवाद!! आम्हा सर्वांना तुमची खूप आठवण येईल. मला खात्री आहे की तुम्ही कुठेतरी पार्टी सुरू केली असेल आणि तुमच्याभोवती अनेक आत्मे नाचत आणि मनसोक्त हसत असतील!! आपण पुन्हा भेटेपर्यंत, मस्त रहा!!! तुझ्यावर प्रेम आहे."
डिनो मोरियाने शेअर केलेल्या या पोस्टवर चाहते, कलाकार, सेलिब्रिटींनी त्यांच्या वडीलांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच त्याच्यासाठी काळजी व्यक्त केली आहे. डिनो मोरिया अलिकडेच अक्षय कुमारच्या 'हाऊसफुल 5'मध्ये झळकला होता. चाहते त्याच्या आगामी प्रोजेक्टची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.