Dino Morea: डिनो मोरिया मुंबई पोलिसांसमोर हजर; मिठी नदी घोटाळा प्रकरणात अभिनेत्याची होणार चौकशी

Dino Morea: बॉलिवूड अभिनेता डिनो मोरियाने मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेसमोर (EOW) मिठी नदी घोटाळ्याच्या चौकशीसाठी सोमवारी सकाळी ११ वाजता हजेरी लावली आहे.
Dino Morea
Dino MoreaSaam Tv
Published On

Dino Morea: बॉलिवूड अभिनेता डिनो मोरियाने मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेसमोर (EOW) मिठी नदी घोटाळ्याच्या चौकशीसाठी सोमवारी सकाळी ११ वाजता हजेरी लावली. या प्रकरणात मुख्य आरोपी केतन कदम आणि डिनो मोरिया यांच्यातील अनेक फोन कॉलचे रेकोर्ड पोलीसांना मिळाले असून, त्याच्या अनुषंगाने मोरियाची चौकशी करण्यात आली.

मिठी नदीच्या गाळ काढण्याच्या कामात ब्रुहनमुंबई महानगरपालिकेच्या (BMC) वतीने कोचीस्थित मॅटप्रॉप टेक्निकल सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीकडून यंत्रसामग्री भाड्याने घेण्यात आली होती. या व्यवहारात केतन कदम आणि जय जोशी या आरोपींनी पालिकेकडून अत्यंत वाढीव दराने पैसे घेतल्याचा आरोप आहे. या व्यवहारात BMC च्या वादळ पाणी निचरा विभागातील अधिकाऱ्यांचीही समावेश असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

Dino Morea
Actor Passes Away: १०० हून अधिक चित्रपटात काम करणारे प्रसिद्ध अभिनेते काळाच्या पडद्याआड; मूळ गावी घेतला अखेरचा श्वास

तपासादरम्यान, आरोपींच्या उपकरणांमध्ये BMC अधिकाऱ्यांच्या टेंडर दस्तऐवजांचे कच्चे मसुदे सापडले आहेत. यामुळे BMC च्या अंतर्गत दस्तऐवजांमध्ये अनधिकृत प्रवेश झाल्याचा संशय बळावला आहे. या घोटाळ्याची एकूण रक्कम सुमारे ६५.५ कोटी रुपये असल्याचे तपासात उघड झाले आहे.

Dino Morea
Raid 2 Box Office Collection: अजय देवगण आणि रितेश देशमुखच्या 'रेड 2'ची यशस्वी घोडदौड सुरूच; बॉक्स ऑफिसवर रचला नवा विक्रम

डिनो मोरियाच्या चौकशीचा उद्देश केतन कदम आणि इतर संबंधित पक्षांमधील व्यवहारांबाबत त्याची भूमिका किंवा माहिती स्पष्ट करणे हा आहे. या प्रकरणातील तपास सुरू असून, आणखी कोण या प्रकरणात सहभागी आहे का, हे शोधण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com