Rakhi Sawant At Dindoshi Court Saam Tv
मनोरंजन बातम्या

Rakhi Sawant: 'आदिलला घटस्फोट देणार नाही कारण...' म्हणत राखीने केले धक्कादायक खुलासे, न्यायालयासमोर फोडला हंबरडा

काल झालेल्या सुनावणीत राखीने आईच्या नावाचा हंबरडा फोडत आदिलवर अनेक गंभीर आरोप केले आहे.

Chetan Bodke

Rakhi Sawant And Adil Khan: बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत आणि तिचा पती आदिल खान दुर्राणी यांच्यातील वाद आता फक्त त्यांच्यातील राहिला नसून हा सर्वांच्याच चर्चेचा मुद्दा राहिला आहे. पती आदिल खान दुर्रानीवर तिने मारहाण आणि फसवणुकीचे आरोप केले होते. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर दिंडोशी सत्र न्यायालयाने १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावली होती. काल झालेल्या सुनावणीत राखीने आईच्या नावाचा हंबरडा फोडत आदिलवर अनेक गंभीर आरोप केले आहे.

काल झालेल्या सुनावणीत दिंडोशी सत्र न्यायालयाने आदिलला पोलीस कोठडी सुनावल्याबद्दल तिला आनंद झाल्याचे ती बोलली. राखी म्हणते, “मी देवाचे आभार मानते कारण, आज त्याला पोलीस कोठडी मिळाली. आता थेट आर्थर रोड तुरुंगात जाणार. मी देवाला एवढंच सांगने की त्याला जामीन मिळू नये. नाहीतर तो मला मारून टाकेन. मला त्याची भीती वाटते.आई…” असे म्हणत राखीने न्यायालयाच्या बाहेरच माध्यमांसमोर टाहो फोडला.

एवढंच नाही तर राखीने त्याच्या आरोपांची भली मोठी लिस्ट माध्यमांसमोर ठेवली. यावेळी राखी म्हणते, “आदिलने लग्न करुन मला इस्लाम धर्म स्वीकारायला लावला. आता लग्नानंतर मी इस्लाम स्वीकारला तरी ही तो मला घटस्फोट द्यायला निघालाय. एका बाईसोबत तुम्ही (लोकांना उद्देशून) लग्न करता, तिचं आयुष्य उद्ध्वस्त करता आणि नंतर तिहेरी तलाक देता. असं नाही होणार. मी त्याला घटस्फोट देणार नाही. त्याला मी माझ्या आयुष्याशी खेळू देणार नाही. माझे बरेच पैसे, दाग- दागिने आदिलकडे आहेत. त्यानेमला जवळपास एक ते दिड कोटी रुपये द्यायचे बाकी आहेत. ”

“समाजात महिलांवर खूप अत्याचार होत आहेत. हुंड्यासाठी छळ केला जातो. माझ्यासोबतही आदिल असाच प्रकार खेळत आहे. लग्नाच्या आठ महिन्यानंतरही मी शांत होते. पण जेव्हा त्याचे दुसऱ्या महिलेसोबत प्रेम प्रकरण सुरु झाले, तेव्हा माझ्या सहनशक्तीचा अंत झाला. मी आदिलला अनेकदा बोलले होते की, त्या बाईला सोड. आदिल मला म्हणतो, मी तिला सोडू शकत नाही, मग मी ही तुला आता सोडू शकणार नाही. ” आता थेट असा इशाराच राखीने आदिलला दिला आहे.

राखीने आदिलवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. राखी म्हणते, आदिलने माझे काही अश्लिल व्हिडिओ शूट केले आहेत. आदिलने मला फसवल्याचाही आरोप तिच्यावर केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुण्यातील विद्यानंद बापटनंतर आता 'एनर्जीमॅन' कामत काकांची चर्चा, गणेशोत्सव, डीजेवर नॉनस्टॉप बोलले!

Coffee Intake: कॉफीशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही? मग जाणून घ्या दिवसाला किती कप कॉफी प्यावी

Maharashtra News Live Update: भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या महिला सदस्यावर जीवघेणा हल्ला

Vidhyanand Bapat: विद्यानंद बापट आले अडचणीत! गुन्हा दाखल करण्याची होतेय मागणी; कोणी आणि का केली मागणी?

Hair Care: पांढरे केस अन् केसगळतीवर करा घरगुती उपाय; नारळाच्या तेलात मिसळा 'हा' पदार्थ

SCROLL FOR NEXT