Soap Hacks : उरलेला साबण फेकून देताय? घरातील कामांसाठी असा करा पुनर्वापर

Saam Tv

नवीन साबण तयार करा

साबणाचे छोटे तुकडे जमा करून खवणीने किसून घ्या. त्यात थोडे पाणी घालून मंद आचेवर मऊ होईपर्यंत गरम करा किंवा वितळवून घ्या. हे मिश्रण साबणाच्या साच्यात किंवा योग्य भांड्यात ओता. थंड झाल्यावर घट्ट होऊन नवीन साबण तयार होईल.

old soap bar uses | PINTEREST

लिक्विड हँडवॉश बनवा

एक भांड्यात कोमट पाणी घेऊन त्यात साबणाचा कीस मिसळा. काही वेळात साबण पाण्यात विरघळेल. मिश्रण थंड झाल्यावर आवश्यकतेनुसार पाणी मिसळून योग्य घट्टपणा आणा आणि स्वच्छ हँडवॉशच्या बाटलीत भरून ठेवा.

old soap bar uses | PINTEREST

कपडे धुणे व डाग काढणे

रुमाल किंवा छोटे कपडे धुण्यासाठी साबणाचे तुकडे एका जाळीदार पिशवीत बांधून वापरा. तसेच साबणाच्या द्रावणाचा वापर कपड्यांवरील हलके डाग स्वच्छ करण्यासाठीही करता येतो.

old soap bar uses | PINTEREST

बाथरूम आणि फरशांची स्वच्छता

बाथरूममधील फरशा, वॉशबेसिन आणि चिकट पृष्ठभाग स्वच्छ करण्यासाठी साबणाचे पाणी उत्तम काम करते. पाण्यात तुकडे विरघळवून घासणीच्या साहाय्याने स्वच्छता करा.

old soap bar uses | PINTEREST

बूट आणि पिशव्या स्वच्छ करा

मळलेले कापडी बूट किंवा पिशव्या स्वच्छ करण्यासाठी साबणाचे थोडे पाणी मऊ कापडावर घेऊन माती व मळ सहज साफ करता येतो.

old soap bar uses | PINTEREST

कपाटातील दुर्गंधी दूर करा

सुगंधी साबणाचे छोटे तुकडे एका स्वच्छ कापडी पिशवीत किंवा सुती कापडात बांधून कपाटात किंवा कपड्यांच्या कप्प्यांमध्ये ठेवा. यामुळे कपाटात मंद सुगंध टिकून राहतो.

old soap bar uses | PINTEREST

दरवाजे आणि ड्रॉवरचे आवाज बंद करा

कपाटाचे दरवाजे किंवा ड्रॉवर उघडझाप करताना करकर आवाज येत असल्यास बिजागरी किंवा चॅनेलवर साबणाचा तुकडा चोळा. साबण नैसर्गिक वंगण म्हणून काम करतो आणि आवाज बंद होतो.

old soap bar uses | PINTEREST

NEXT : सावधान! मोमोजसोबत मिळणारी लाल चटणी ठरू शकते आरोग्यासाठी घातक

WHY MOMO RED CHUTNEY IS DANGEROUS FOR HEALTH | SAAM TV
येथे क्लिक करा