सावधान! मोमोजसोबत मिळणारी लाल चटणी ठरू शकते आरोग्यासाठी घातक

Saam Tv

कृत्रिम रंग

मोमोजची चटनी दिसायला गडद लाल रंगाची असते. तिला आकर्षक रंग देण्यासाठी अनेक ठिकाणी सिंथेटिक फूड कलर्सचा वापर केला जातो. या कृत्रिम रंगांमुळे अ‍ॅलर्जी, त्वचेच्या समस्या आणि विशेषतः मुलांमध्ये आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात.

Momo red Chutney | pinterest

मोनोसोडियम ग्लूटामेट

चव वाढवण्यासाठी काही व्यावसायिक चटन्यांमध्ये एमएसजीचा वापर केला जातो. यामुळे काहींना डोकेदुखी, मळमळ, अस्वस्थता किंवा छातीची धडधड वाढणे यांसारख्या समस्या जाणवू शकतात.

Momo red Chutney | pinterest

प्रिजर्व्हेटिव्ह्जचा अतिवापर

चटनी दीर्घकाळ टिकून राहावी यासाठी सोडियम बेंजोएट आणि पोटॅशियम सॉर्बेट सारखे प्रिजर्व्हेटिव्ह्ज मिसळले जातात. यांचे प्रमाण जास्त झाल्यास पचनक्रिया बिघडू शकते.

Momo red Chutney | pinterest

अति तिखटपणा

या चटनीत कॅप्साइसिनचे प्रमाण जास्त असू शकते. यामुळे पोटात जळजळ, ॲसिडिटी, गॅस, जुलाब आणि पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.

Momo red Chutney | pinterest

निकृष्ट घटक

चटनी बनवण्यासाठी कुजलेले टोमॅटो, लसूण किंवा मिरची वापरल्यास त्यात जिवाणू वेगाने वाढतात, ज्यामुळे अन्नविषबाधा आणि उलट्या-जुलाबाचा धोका वाढतो.

Momo red Chutney | pinterest

जास्त मीठ आणि निकृष्ट तेल

चव वाढवण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी अनेकदा जास्त मीठ आणि कमी दर्जाचे तेल वापरले जाते. यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराचा धोका बळावतो.

Momo red Chutney | pinterest

अस्वच्छता

रस्त्यावरील स्टॉलवर ही चटनी मोठ्या प्रमाणावर बनवून तासनतास उघड्यावर ठेवली जाते. उन्हामुळे, धुळीमुळे आणि माशांमुळे त्यात बॅक्टेरिया वाढतात, ज्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता असते.

Momo red Chutney | pinterest

विशेष काळजी घ्यावी?

  • ॲसिडिटी किंवा गॅसचा त्रास असणारे लोक

  • पोटात अल्सर किंवा आयबीएस असणारे रुग्ण

  • लहान मुले, वृद्ध आणि कमी प्रतिकारशक्ती असलेले लोक

Momo red Chutney | pinterest

NEXT : दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम देणारे ६ सुपरफूड्स; मजबूत हाडांसाठी आजच आहारात समाविष्ट करा

6 SUPERFOODS WITH MORE CALCIUM THAN MILK FOR STRONG BONES | SAAM TV
येथे क्लिक करा