दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम देणारे ६ सुपरफूड्स; मजबूत हाडांसाठी आजच आहारात समाविष्ट करा

Saam Tv

दुधाला पर्याय

मजबूत हाडांसाठी लहानपणापासून दूध पिण्याचा सल्ला दिला जातो, पण दुधाशिवायही अनेक गोष्टींमध्ये भरपूर कॅल्शियम असते.

calcium rich foods | pinterest

कॅल्शियमचे प्रमाण

सर्वसामान्यपणे १०० ग्रॅम दूधामध्ये सुमारे १२५ मिलीग्राम कॅल्शियम असते, पण काही देशी पदार्थ या बाबतीत दुधाच्या कितीतरी पुढे आहेत.

calcium rich foods | pinterest

तिळ

तिळामध्ये कॅल्शियम भरपूर असते; १०० ग्रॅम विनासाले तिळामध्ये तब्बल ९७५ मिलीग्राम कॅल्शियम असते, जे हाडांसाठी अत्यंत उत्तम आहे.

Sesame Seeds | pinterest

रागी

रागीला कॅल्शियमचे पॉवरहाऊस मानले जाते, कारण १०० ग्रॅम रागीमध्ये सुमारे ३४४ मिलीग्राम कॅल्शियम आढळते.

Finger Millet | pinterest

राजगीरा

राजगीरा हा ग्लुटेन-फ्री असून, त्याच्या १०० ग्रॅम प्रमाणामध्ये सुमारे २१५ मिलीग्राम कॅल्शियम असते जे हाडांच्या मजबुतीसाठी फायदेशीर ठरते.

Amaranth | pinterest

शेवग्याची पाने

शेवग्याच्या पानांमध्ये प्रति १०० ग्रॅम १८५ मिलीग्राम कॅल्शियम आणि व्हिटॅमिन सी असते, जे शरीराला पोषण देते.

Drumstick leaves | pinterest

अंजीर

गोड लागणारा सुका अंजीर हाडांच्या दीर्घकालीन आरोग्यासाठी चांगला असून, त्याच्या १०० ग्रॅममध्ये १६२ मिलीग्राम कॅल्शियम मिळते.

Dried Fig | pinterest

राजमा

राजमा चवदार असण्यासोबतच पौष्टिक आहे; १०० ग्रॅम कच्चे राजमामध्ये सुमारे १४३ मिलीग्राम कॅल्शियम असते, जे दुधापेक्षा जास्त आहे.

Kidney Beans | pinterest

NEXT : महिलांनो, घराबाहेर पडताना बॅगेत ठेवा या ७ महत्त्वाच्या गोष्टी; संकटाच्या वेळी येतील उपयोगी!

Women Safety Tips | Saam Tv
येथे क्लिक करा