Shahrukh Khan Tweet: विराट कोहली-रवींद्र जडेजाने धरला 'पठान'च्या गाण्यावर ठेका; शाहरुख म्हणाला, मलाही शिकावं लागेल...

Shahrukh Khan Tweet: विराट कोहली-रवींद्र जडेजाने धरला 'पठान'च्या गाण्यावर ठेका; शाहरुख म्हणाला, मलाही शिकावं लागेल...

Shahrukh Commented On Virat-Jadeja Dance: शाहरुख खान 25 जानेवारी रोजी प्रदर्शित झालेल्या 'पठान' चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. 'पठान' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. दरम्यान हे सगळं होत असताना शाहरुख खान त्याच्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी ट्विटरवर #AskSRK हे सेशन घेतो. व्हॅलेंटाईन डेनिमित्त चाहत्यांच्या भेटीला आलेल्या शाहरुख वर सर्वांनी प्रश्नांचा भडीमार केला. एका चाहत्याच्या ट्विटने शाहरुखचे लक्ष वेधून घेतले आणि अपेक्षेप्रमाणे त्याने गंमतीशीर उत्तर दिले.

#AskSRK के सेशन सुरु करण्याआधी शाहरुखने एक ट्विट केले. त्या ट्विटच्या माध्यमातून त्याने नेटकऱ्यांना त्याचे #AskSRK हे सेशन सुरु होत असून सर्ववणी त्यात सहभागी व्हावे यासाठी केले होते. “बहुत दिन हो गये….हम कहाँ से कहां आ गये….मला वाटतं की स्वतःला अपडेट करण्यासाठी #AskSRK ला थोडेसे करणे चांगलं आहे. प्लिज गंमतीशीर प्रश्न विचार…. आपण सुरु करू!" असे ट्विट शाहरुख खानने केले होते.

Shahrukh Khan Tweet: विराट कोहली-रवींद्र जडेजाने धरला 'पठान'च्या गाण्यावर ठेका; शाहरुख म्हणाला, मलाही शिकावं लागेल...
MC Stan Beats Record: 'बिग बॉस 16'चा विजेता एमसी स्टॅनने मोडला विराटचाही रेकॉर्ड; अनेक दिग्गजांना मागे टाकत केली अफलातून कामगिरी

ट्विटरवरील एका नेटकाऱ्याने गेल्या आठवड्यात नागपुरात पार पडलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिल्या कसोटी इनिंग ब्रेक दरम्यान मैदानावर 'पठान' चित्रपटातील 'झूम जो पठान' या गाण्याच्या हुक स्टेपचा करताना विराट कोहली आणि रवींद्र जडेजाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या नेटकाऱ्याने शाहरुखला त्यांच्या डान्सवर मत व्यक्त करण्यास सांगितले.

“पठान या डान्सवर काहीतरी बोला,” असे ट्विटर युजरने विचारले. यावर शाहरुख खानने उत्तर दिले, “ते माझ्यापेक्षा चांगले करत आहेत!! विराट आणि जडेजाकडून शिकावं लागेल!!!”

शाहरुख खानच्या उत्तराला काही मिनिटांच 44,000 पेक्षा जास्त व्ह्यूज आणि 4,200 पेक्षा जास्त लाईक्स मिळाले होते. शाहरुखच्या या पोस्ट अनेक नेटकरी कमेंट देखील कमेंट होते.

तर त्यातिल काही कमेंट्स, "तुम्ही काहीही करा किंवा नका करू तुमच्यामुळे माझ्या चेहऱ्यावर नेहमी हसू येत!!! अणे ते मी थांबू शकत नाही!”. "तू माझा व्हॅलेंटाईन होशील का?". “क्रिकेट किंग आणि बॉलीवूड किंग,”. “त्यांना कोलकाता नाईट रायडर्स संघात घ्या,”. अशा मजेशीर कमेंट शारुखच्या ट्विटवर आल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com