Rakhi Sawant Marriage: आदिलला जामीन मिळणार का? आज कोर्टात होणार सुनावणी, राखी करतेय 'हा' प्रयत्न

पोटगी मिळविण्यासाठी करत असल्याच्या आरोपावर राखीने खुलासा केला आहे.
Rakhi Sawant
Rakhi Sawant Saam TV

Rakhi Sawant-Adil Durrani Case: अभिनेत्री राखी सावंत नेहमीच चर्चेत असते. वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारी राखी आता तिच्या लग्नामुळे त्रासली. मराठी बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर राखीने तिचे लागण आदिल दुर्रानीशी झाल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्याच्या लग्न नात्यात अनेक घडामोडी घडल्या. त्यामुळे तिचा नवरा आदिल याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

अदिलवर राखीने मारहाण केल्याचा आणि धोका दिल्याचा आरोप करत पोलिसात तक्रार केली आहे. तसेच आदिलचे विवाहबाह्यसंबंध असल्याचेही राखीने म्हटले आहे. इतके सगळे होऊनही राखी आदिलाला तलाक देणार नाही, असे म्हणत आहे.

Rakhi Sawant
Marathi Movie Gets Trolled: गौतमी पाटील नाचलेली चालते? 'ढिशक्यांव' चित्रपटावर टीका करणाऱ्यांना निर्मात्यांचा सवाल

नुकताच झालेल्ल्या एका मुलाखतीत राखीने तिच्या आणि आदिलच्या लग्नाविषयी काही गोष्टी सांगितल्या. राखी म्हणाली, एकवेळ मरण पत्करेन पण आदिलला तलाक देणार नाही. राखीने सांगितले की, 'कोणीही माझ्या आयुष्याशी खेळू नाही शकत. मी मरेपर्यंत लढेन पण तलाक देणार नाही.'

तसेच राखी, आदिलला जामीन मिळू नये यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे. आज म्हणजे १५ फ्रेब्रुवारीला कोर्ट दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर आदिलच्या जामिनावर निर्णय देईल.

राखी हे सगळं पोटगी मिळविण्यासाठी करत असल्याच्या आरोपावर राखीने खुलासा केला आहे. राखी म्हणाली, 'मला पोटगी घ्यायची असती तर मी माझा पहिला पती रितेश जो करोडपती आहे, त्याच्याकडून घेतली असता. पण मी तसे केले नाही. माझे खरे लग्न फक्त आदिलशी झाले आहे.

आम्ही कोर्ट मॅरेज केले असून रजिस्टर मॅरेजही केले आहे. मी सध्या पोटगीचा विचार करत नाही, मी आदिलला जामीन कसा मिळणार नाही याचा विचार करत आहे. कारण जामीन मिळताच तो त्याची गर्लफ्रेंड निवेदितासोबत लग्न करणार असल्याचे आदिलचे सांगितले आहे.

'मी लोकांना आणि वकिलांना सांगू इच्छिते की, माझ्यावर कलंक लावणे थांबवा. आधीच माझ्या पतीने मला अनेक जखमा दिल्या आहेत. यासोबत राखीने आदिलला भेटलेल्या अभिनेत्री शैलीबद्दलही सांगितले, आदिल राखीला शैलीशी बोलण्यापासून कसे थांबवत असे.

शैलीनेही आदिलचा खरा चेहरा राखीसमोर आणण्याचा प्रयत्न केला, पण आदिलने तिला अडवले. शैलीने राखीला आधी इशारा दिला होता की सर्वकाही प्लॅनिंग करून करण्यात येत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com