Diljit And Modi Google
मनोरंजन बातम्या

Diljit-modi Viral Video : दिलजीत डोसांझनं गायलं गाण, मोदींनी दिली दाद ; व्हिडीओ झाला व्हायरल

Diljit-modi Viral Video : गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ यांनी नवीन वर्षाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि विविध विषयांवर चर्चा केली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Diljit-modi Viral Video : भारतीय गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझ यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि संगीतासह विविध विषयांवर चर्चा केली. भेटीबद्दल आनंद व्यक्त करताना त्यांनी पंतप्रधानांसोबतची ही "अत्यंत अविस्मरणीय भेट" असल्याचे वर्णन केले. या भेटीचा त्यांच्या व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दिलजीतने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत गाणे गायले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा करत असताना दिलजीत दोसांझने गुरु नानक यांना समर्पित गाणे गायल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ANI ने शेअर केलेल्या या क्लिपमध्ये दिलजीत उत्साहाने गाणे गात असल्याचे दिसून आले आहे, तर पंतप्रधान मोदी ढोलकीप्रमाणे टेबलावर थाप मारत त्याला या गाण्यात साथ देत होते. या व्हिडिओने चाहते खूप खुश झाले आहेत.

दिलजीतने पंतप्रधानांना भेटीची पोस्ट शेअर करत त्याखाली कॅप्शनमध्ये लिहिले, "२०२५ ची एक शानदार सुरुवात. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्यासोबतची एक अतिशय संस्मरणीय भेट. आम्ही अर्थातच संगीतासह अनेक गोष्टींबद्दल बोललो!". त्याच्या पोस्टला उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी म्हटले, "दिलजीत दोसांझ यांच्याशी एक उत्तम संवाद! तो खरोखरच बहुआयामी आहे, प्रतिभा आणि परंपरा यांचे मिश्रण करतो. आम्ही संगीत, संस्कृती आणि इतर गोष्टींद्वारे एकमेकांशी जोडले गेलो."

या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गायक-अभिनेत्याच्या कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक केले. ते म्हणाले, “जेव्हा हिंदुस्थानातील एका छोट्या गावातून येणारा मुलगा जागतिक व्यासपीठावर चमकतो तेव्हा ते आश्चर्यकारक वाटते. तुमच्या कुटुंबाने तुमचे नाव दिलजीत ठेवले आहे आणि तुम्ही तुमच्या नावाप्रमाणेच लोकांची मने जिंकत आहेत.” दिलजीत पुढे म्हणाले, “आम्ही 'मेरा भारत महान' (माझा भारत महान आहे) असे वाचत होतो, पण जेव्हा मी संपूर्ण भारतात प्रवास केला तेव्हा मला कळले की आपला देश महान का आहेत.”

दिलजीत दोसांझने त्याच्या यशस्वी दिल-लुमिनाटी इंडिया टूरचा शेवट लुधियाना येथे झाला. नवीन वर्षाचे स्वागत एका उच्च-ऊर्जेच्या सादरीकरणाने केले. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पंजाब कृषी विद्यापीठ (पीएयू) मैदानावर झालेल्या या कार्यक्रमात, २६ ऑक्टोबर रोजी नवी दिल्लीत सुरू झालेल्या त्याच्या दोन महिन्यांच्या दौऱ्याचा शेवट झाला. दिलजीतचा दिल-लुमिनाटी इंडिया टूरमध्ये दीपिका पदुकोण आणि कार्तिक आर्यन सारख्या बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांनी उपस्थिती लावली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local Block: मध्य रेल्वेवर २ दिवसांचा रात्रकालीन ब्लॉक; लोकलसह ट्रेनच्या वेळापत्रकात बदल, वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: मंत्री विखे पाटील यांचा जाहीर नागरी सत्कार घेण्यास नकार

Sakhi Gokhale: मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज...

Prabalgad Fort History: ट्रेकिंगसाठी खास! सह्याद्री पर्वतरांगेतील प्रबळगड किल्ल्याचे ऐतिहासिक वैशिष्ट्ये आणि इतिहास

अंगणाडी सेविकांना भाऊबीजेचं गिफ्ट! दिवाळीचा बोनस कधी मिळणार? आदिती तटकरेंनी थेट तारीख सांगितली

SCROLL FOR NEXT