Jilabi Movie : ‘जिलबी’ चित्रपटात पर्ण पेठे साकारणार गूढ भूमिका...

Jilabi : १७ जानेवारीला येणारा ‘जिलबी’ चित्रपटात अभिनेत्री पर्ण पेठे गूढ भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात प्रसाद ओक, स्वप्नील जोशी, शिवानी सुर्वे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
jilabi parna pethe
Jilabi parna petheSaam Tv
Published On

Jilabi Movie : मालिका, नाटक चित्रपटांतून घराघरांत पोहचलेली अभिनेत्री पर्ण पेठे आता ‘जिलबी’ चित्रपटात एका वेगळ्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे. पर्णने आजवर साकारलेल्या व्यक्तिरेखांपेक्षा ‘जिलबी’ चित्रपटातील रुबीना ही मुस्लिम मुलीची भूमिका खूपच वेगळी आहे. रुबिना अत्यंत कणखर आणि धाडसी मुलगी आहे. आनंद पंडित मोशन पिक्चर्स निर्मित ‘जिलबी’ चित्रपट १७ जानेवारीला आपल्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन नितीन कांबळे यांनी केले आहे.

या भूमिकेसाठी तिचा लूक वैशिष्ट्यपूर्ण आहे. आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना पर्ण सांगते, ‘मी खूप काही ठरवून असं करत नाही. कथेमध्ये, भूमिकेत काही वेगळेपण असेल, तर ते करायला आवडतं’. चांगल्या विषयामुळे मी या चित्रपटाला होकार दिला. माझ्या वेगवेगळ्या भूमिकांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला असून ‘जिलबी’ चित्रपटातील माझ्या या भूमिकेचं प्रेक्षक नक्कीच स्वागत करतील, असा विश्वास पर्ण व्यक्त करते. इतर जॉनरच्या चित्रपटांच्या तुलनेत मराठीमध्ये सस्पेन्स थ्रीलरपटांची संख्या फार कमी असून, ‘जिलबी’ हा चित्रपट त्यांची उणीव नक्की भरून काढणारा असेल, असे पर्ण पेठे सांगते.

jilabi parna pethe
Govinda : ‘पार्टनर 2’ मध्ये सलमानसोबत गोविंदा कॉमेडीचा तडका लावणार? सुनीता आहूजा म्हणाली....

जिलेबी या चित्रपटात घटना-प्रसंगांतून निर्माण झालेले गूढ उकलताना उद्योगपती सौरव सुभेदार, डॅशिंग पोलीस अधिकारी विजय करमरकर याची मदत घेताना दिसणार आहे. यातील पोलीस अधिकारी विजय करमरकर याची भूमिका स्वप्नील साकारणार आहे. चित्रपटातील गूढाचे रहस्य शोधून काढताना कोणत्या गोष्टी प्रेक्षकांसमोर येणार हे पाहणे औत्सुकाचे ठरणार आहे.

jilabi parna pethe
Janhvi Kapoor : 'आई आवडते, मुलगी नाही'; जान्हवी श्रीदेवींच्या तुलनेवर राम गोपाल वर्मांचे मोठे वक्तव्य

अभिनेता स्वप्नील जोशी, प्रसाद ओक, शिवानी सुर्वे गणेश यादव, प्रणव रावराणे, अश्विनी चावरे, प्रियांका भट्टाचार्य या कलाकारांच्या भूमिका ‘जिलबी’ चित्रपटात आहेत. ‘जिलबी’ चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद मच्छिंद्र बुगडे यांचे आहेत. आनंद पंडित आणि रूपा पंडित हे निर्माते आहेत. क्रिएटिव्ह दिग्दर्शन आणि सहनिर्मितीची जबाबदारी राहुल व्ही. दुबे यांनी सांभाळली आहे. छायांकन गणेश उतेकर तर कलादिग्दर्शन कौशल सिंग यांचे आहे. कार्यकारी निर्माते महेश चाबुकस्वार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com