Sridevi and her daughter Janhvi Kapoor
Sridevi and her daughter Janhvi KapoorSaam Tv

Janhvi Kapoor : 'आई आवडते, मुलगी नाही'; जान्हवी श्रीदेवींच्या तुलनेवर राम गोपाल वर्मांचे मोठे वक्तव्य

Janhvi Kapoor : चित्रपट निर्माते राम गोपाल वर्मा यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत श्रीदेवी आणि तिची मुलगी जान्हवी कपूर सोबत तुलना केली आहे. तसेच यावेळी तिच्या कामाबद्दल देखील त्यांनी भाष्य केले.
Published on

Janhvi Kapoor : श्रीदेवी त्यांच्या काळातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. आजही जेव्हा जेव्हा त्यांच्या उल्लेख होतो तेव्हा लोक त्यांची प्रशंसा करताना थकत नाहीत. या लोकांमध्ये एक नाव आहे ते म्हणजे चित्रपट निर्माता राम गोपाल वर्मा. त्यांनी त्यांच्या मुलाखतींमध्ये अनेकदा श्रीदेवींचा उल्लेख केला आहे, ज्यामध्ये ते अनेकदा त्यांची प्रशंसा करताना दिसतात. मात्र, त्यांची काही विधाने वादग्रस्त देखील आहेत. अलीकडेच रॅम गोपाळ वर्मा यांनी श्रीदेवी आणि मुलगी जान्हवी कपूरबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.

जान्हवी कपूरने सध्याच साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआरसोबत 'देवरा' या चित्रपटात दिसली होती, या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. या चित्रपटाच्या फोटोशूट दरम्यान देवरा अभिनेता ज्युनियर एनटीआरने जान्हवी कपूरबद्दल सांगितले होते की ती हुबेहुब तिच्या आईसारखी दिसते. त्यानंतर नुकत्याच झालेल्या मुलाखतीत राम गोपाल वर्मा यांनी आपले मत व्यक्त केले असून या मताचे खंडन केले आहे.ते म्हणाला की, मला अजूनही जान्हवीमध्ये श्रीदेवी दिसत नाही.

 Sridevi and her daughter Janhvi Kapoor
Paatal Lok Season 2 Teaser : 'खेल अभी बाकी है….'; रक्तरंजित आणि भीतीदायक 'पाताल लोक 2' येतोय 'या' दिवशी

श्रीदेवीला प्रेक्षक म्हणून पाहायचे

श्रीदेवीचे कौतुक करताना रॅम गोपाळ वर्मा म्हणाले, 'पडहारेल्ला व्यासू' असो किंवा 'वसंत कोकिला', तिने अनेक प्रकारचे परफॉर्मन्स दिले आहेत. खरे सांगायचे तर, तिचा अभिनय पाहिल्यानंतर, मी एक चित्रपट निर्माता आहे हे विसरून जायचो आणि म्हणून प्रेक्षक तिला आवडीने पाहायचे. एनटीआरच्या चर्चेवर आपली प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, श्रीदेवी त्याला खूपच आवडत असतील, म्हणूनच तो असं बोलला असेल.

 Sridevi and her daughter Janhvi Kapoor
Boney Kapoor : 'श्रीदेवी माझ्या आजूबाजूला आहे...', बोनी कपूर पत्नी श्रीदेवीची आठवण काढत झालवे भावूक

मुलाखतीदरम्यान, जेव्हा राम गोपाल वर्मा यांना जान्हवी कपूरसोबतच्या कामाबद्दल विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, मला आई आवडली, पण मुलगी आवडली नाही आणि मी हे नकारात्मक बोलत नाही.माझ्या कारकिर्दीत असे अनेक मोठे कलाकार आहेत ज्यांच्याशी मी विशेष संबंध जोडू शकलो नाही, ज्यामध्ये जान्हवी कपूरचे नाव देखील समाविष्ट आहे. सध्या तरी जान्हवीसोबत चित्रपट करण्याचा माझा कोणताही विचार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com