दिलजीत दोसांझ हा प्रसिद्ध पंजाबी गायक आणि अभिनेता आहे. दिलजीत दोसांझच्या गाण्याचे कॉन्सर्ट देशभर सुरू असतात. त्याच्या आवाजाचे अनेक चाहते आहेत. नुकतंच १४ डिसेंबरला भारतात चंदीगढ येथे दिलजीतचा कॉन्सर्ट शो झाला. याचदरम्यान दिलजीतने मोठा निर्णय घेतला आहे. दिलजीतने पुन्हा भारतात कॉन्सर्ट न करण्याचा टोकाचा निर्णय घेत चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे.
दिलजीतने चंदीगढ येथील त्याच्या कॉन्सर्ट शो दरम्यान मोठा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिलजीत म्हणाला की, जो पर्यंत भारतातील कॉन्सर्ट इन्फ्रास्ट्रक्चर सुधारत नाही तोपर्यंत मी पुन्हा भारतात कॉन्सर्ट करणार नाही. भारतात लाईव्ह कॉन्सर्ट शोसाठी पायाभूत सुविधा नाहीत. हे कमाईचे मोठे क्षेत्र आहे. यातून अनेकांना रोजगारही मिळतात. कृपया यावर तुम्ही लक्ष द्याल.
भारतात हैदराबाद, अहमदाबाद, लखनौ, पुणे, कोलकत्ता आणि बेंगळूर येथे दिलजीतचे लाईव्ह कॉन्सर्ट शो झाले. दिलजीतच्या लाईव्ह कॉन्सर्ट शोला चाहत्यांची तुफान गर्दी होते.
नुकत्याच झालेल्या चंदीगढ येथील दिलजीतच्या लाईव्ह कॉन्सर्ट शो पाहण्यासाठी अनेक चाहते झाडावर चढलेले दिसले. तर अनेकजण कॉन्सर्टच्या बाहेर रस्त्यावर नाचताना दिसले. सोशल मीडियावर याचदरम्यानचे व्हिडीओ तुफान व्हायरल झाले आहेत.
तर, यापूर्वी अनेकदा दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टशोच्या तिकीटांचा काळाबाजार झाल्याचा समोर आले आहे. तिकिटासाठी अधिकचे पैसे खर्च करूनही जागा मिळाली नाही तर अनेकांना चाहत्यांनी भर शोमध्ये दारू, ड्रग्ज घेण्यात आलेलं दिसलं आहे.