Dhurandhar 2 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dhurandhar 2: 'धुरंधर 2' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, रणवीर सिंग विरोधात गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

Dhurandhar 2: ‘धुरंधर २’ चित्रपटातील सीनवरून वाद निर्माण झाला आहे. शीख समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुंबईत रणवीर सिंग आणि निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Shruti Vilas Kadam

Dhurandhar 2: सध्या थिएटर आणि सोशल माडियावर तुफान गाजत असलेला आदित्य धरचा ‘धुरंधर २’ बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. तीन दिवसात या चित्रपटाने तब्बल ३०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. पण आता हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटामुळे मुंबईत अभिनेता रणवीर सिंग याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चित्रपटातील एका सीनमुळे अभिनेता रणवीर सिंगवर शीख समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. चित्रपटातील एका सीनमुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत मुंबईच्या मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.

‘शिख इन महाराष्ट्र’ संघटनेचे अध्यक्ष सरदार गुरज्योत सिंग यांनी या प्रकरणी आक्षेप नोंदवला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, चित्रपटातील एका सीनमध्ये शीख धर्म आणि गुरु गोविंद सिंग यांचा अपमान करण्यात आला आहे. त्यामुळे शीख समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

यामुळे चित्रपट निर्माता आणि अभिनेत्याविरोधात कारवाईची मागणी करण्यात आली आहे. तसेच त्यासीनसाठी तात्काळ माफी मागावी, अशी मागणीही तक्रार अर्जात नमूद करण्यात आली आहे. निर्मिती संस्थेकडून यावर समाधानकारक भूमिका न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे 'धुरंधर २' चित्रपटबाबत विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी चित्रपटावरील आरोप गंभीर असल्याचे म्हटले आहे, तर काहींनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. या वादावर अद्याप चित्रपट निर्माते किंवा रणवीर सिंगची अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. मात्र, पुढील काही दिवसांत या प्रकरणात अधिक घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yavatmal Heat Wave: यवतमाळमध्ये उष्णतेची लाट; ४८ तासात जिल्ह्यात ८ जणांचा मृत्यू

पुढील एक वर्षात मोदी सरकार कोसळणार; राहुल गांधींचा खळबळजनक दावा|VIDEO

Child Eye Care: लहान मुलांना जेवताना मोबाईल देताय? भविष्यात होऊ शकतात मोठे परिणाम, तज्ञांचा गंभीर इशारा

Maharashtra News Live Update: सांगोल्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

Crime News: आधी प्रेमाच्या आणाभाका; हॉटेलमध्ये नेत भांगेत कूंकू भरलं, नंतर अत्याचार अन्... विद्यार्थिनीसोबत नको ते घडलं

SCROLL FOR NEXT