Dhurandhar 2: उझैर बलोचचा आदित्य धरलसाठी खास मेसेज; म्हणाला, 'माझ्या आयुष्यातील बेस्ट ईद'

Dhurandhar 2: धुरंधर 2 हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच चर्चेत आहे आणि आतापर्यंत ३३९ कोटींची कमाई करून त्याने नवा रेकॉर्ड केला आहे. धुरंधर २ प्रदर्शनानंतर दानिश पांडोरने लिहीला खास मेसेज.
Dhurandhar 2
Dhurandhar 2Saam Tv
Published On

Dhurandhar 2: धुरंधर 2 हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच चर्चेत आहे आणि आतापर्यंत ३३९ कोटींची कमाई करून त्याने नवा रेकॉर्ड केला आहे. शिवाय, धुरंधर 2 ला बॉलिवूड आणि दक्षिण भारतीय अशा दोन्ही चित्रपटसृष्टींमधील दिग्गजांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. या चित्रपटात उझैर बलोच ही भूमिका साकारणाऱ्या दानिश पांडोरने नुकतीच धुरंधर 2 चे दिग्दर्शक आदित्य धर यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. त्याने या वर्षाची ईद आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम ईद असल्याचेही नमूद केले. सोशल मीडियावर दिग्दर्शक आदित्य धर यांचे आभार मानत, दानिशने 'उझैर'ची भूमिका आपल्यावर सोपवल्याबद्दल आदित्य यांचे आभार मानले.

'धुरंधर' सोबतचा फोटो शेअर केला

धुरंधर 2 मध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या दानिशने, काही वेळापूर्वीच आपल्या इन्स्टाग्रामवर आदित्य यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला. या चित्रपटाचा एक भाग होण्याची संधी दिल्याबद्दल त्याने दिग्दर्शकाचे मनापासून आभार मानले. हा चित्रपट १९ मार्च रोजी, म्हणजेच ईदच्या अगदी आधी, चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. दानिशने याला आपल्याला आतापर्यंत मिळालेली सर्वोत्तम 'ईदी' म्हटले आणि त्याने लिहिले: "आदित्य धर सर, तुमच्या या भव्य प्रकल्पाचा एक भाग बनवल्याबद्दल आणि मला 'उझैर'ची भूमिका दिल्याबद्दल पुन्हा एकदा तुमचे आभार.

Dhurandhar 2
Dhurandhar 2: अल्लू अर्जुन ते अनन्या पांडे; चाहत्यांसह आता सेलिब्रिटींमध्येही 'धुरंधर 2'ची क्रेझ

दानिशने पुढे लिहीले, तुमच्यासोबत काम करणे हा केवळ एक अनुभव नव्हता; ती एक अशी भावना होती जी मी आयुष्यभर जपून ठेवीन. माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल, माझ्या क्षमतेवर विश्वास दाखवल्याबद्दल आणि तुमच्या चित्रपटात मला इतकी उत्तम भूमिका दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. माझ्या हृदयाचा एक तुकडा कायम इथेच राहील. माझे 'बॉस', मी तुमचा सदैव ऋणी राहीन. लव्ह यू. ही आतापर्यंतची बेस्ट 'ईदी' आहे. धुरंधर 2."

Dhurandhar 2
Durandhar 2: कोण आहे दाऊद? 'धुरंधर 2'मध्ये 'बडे साहेब'ची भूमिका साकारणारा अभिनेता नक्की कोण?

'धुरंधर'ने रचला नवा रेकॉर्ड

५ डिसेंबर २०२५ रोजी प्रदर्शित झालेल्या 'धुरंधर' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही जबरदस्त कामगिरी केली होती. १,३५० कोटींहून अधिक कमाई करत 'धुरंधर'ने सर्वांनाच थक्क केले. आता, 'धुरंधर २' हा चित्रपटही चित्रपटगृहांमध्ये दाखल झाला आहे, त्याला प्रेक्षकांकडून अत्यंत उत्साही प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने तीन दिवसात ३०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य धर यांनी केले असून, रणवीर सिंग आणि सारा अर्जुन यांनी यात मुख्य भूमिकेत आहेत. तर अर्जुन रामपाल, संजय दत्त, आर.माधवन सारखे कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत आहेत.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com