Shakira: शकीराचा भारतातील कॉन्सर्ट रद्द; 32 हजाराचं होतं एक तिकीट, या कारणामुळे घेतला मोठा निर्णय

Shakira Indian concert: पॉप आयकॉन शकीराचा भारतात १९ वर्षांच्या कालावधीनंतर कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. २००७ मध्ये मुंबईत कॉन्सर्टनंतर, एप्रिल २०२५ मध्ये हा कॉन्सर्ट होणार होता. पण आता हा शो रद्द करुन पुढे ढकलण्यात आला आहे.
Shakira Indian concert
Shakira Indian concertSaam Tv
Published On

Shakira Indian concert: ग्रॅमी पुरस्कार विजेती जागतिक पॉप गायिका शकीराच्या भारतातील कॉन्सर्टची घोषणा नुकतीच करण्यात आली होती. तिच्या या कॉन्सर्टसाठी चाहते प्रचंड उत्साहित होते, मात्र, आता बातमी येत आहे की हे कॉन्सर्ट रद्द करुन पुढे ढकलण्यात आले आहे. आयोजकांनी सोशल मीडियावर ही माहिती देत स्पष्ट केले की, इराण व इस्रायल यांच्यातील सध्याच्या संघर्षामुळे हा कॉन्सर्ट आयोजित केला जाणार नाही. अद्याप कोणत्याही नवीन तारखा जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. यामुळे तिचे चाहते निराश झाले आहेत.

Shakira Indian concert
Durandhar 2: कोण आहे दाऊद? 'धुरंधर 2'मध्ये 'बडे साहेब'ची भूमिका साकारणारा अभिनेता नक्की कोण?

या कारणामुळे कॉन्सर्ट रद्द

भारतातील शकीराचा कॉन्सर्ट पुढे ढकलल्यामुळे चाहते साहजिकच नाराज झाले आहेत. आयोजक संस्था 'District'ने इन्स्टाग्रामवर एक सविस्तर पोस्ट लिहून कॉन्सर्ट का रद्द केल्याचे कारण सांगितले. पोस्टमध्ये लिहीले, "सध्याची जागतिक भू-राजकीय परिस्थिती आणि प्रादेशिक तणावामुळे, शकीराची 'फिडिंग इंडिया' हा कॉन्सर्ट पुढे ढकलण्यात आला आहे. आमचे चाहते, कलाकार आणि production team सुरक्षा व संरक्षण ही आमच्यासाठी सर्वात महत्वाचे आहे.

Shakira Indian concert
Rohit Shetty: रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा; उत्तर प्रदेश कनेक्शन आलं समोर

पैसे परत केले जातील

'District' ने जाहीर केले की, ते नवीन तारखा लवकरच जाहीर करतील. शिवाय, ज्यांनी कोणी तिकिटे खरेदी केली आहेत, त्यांना तिकिटांचे पैसे परत मिळतील; ही रक्कम त्यांनी ज्या माध्यमातून भरली होती, त्याच माध्यमातून पूर्ण केली जाईल. नवीन तारीख निश्चित करण्यासाठी ते सध्या कलाकारांशी चर्चा करत आहेत.

एका तिकीटाची किंमत

'फिडिंग इंडिया कॉन्सर्ट' (Feeding India Concert) उपक्रमाचा एक भाग म्हणून, Zomato आणि District यांच्या संयुक्त विद्यमाने शकीराच्या कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले होते. हा कॉन्सर्ट १०-११ एप्रिल रोजी मुंबईत आणि १५ एप्रिल रोजी दिल्लीत होणार होता. मुंबईमध्ये, सर्वात महागडा (प्रीमियम) पर्याय म्हणजे 'HSBC Starstruck Lounge Pass' हा होता, ज्याची किंमत ३२,००० रुपये इतकी होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com