Dhurandhar vs Avatar-Fire and Ash Collection saam tv
मनोरंजन बातम्या

Dhurandhar vs Avatar-Fire and Ash Collection : 'अवतार'च्या रिलीजनंतरही बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर' ची हवा, रणवीरच्या चित्रपटाने किती कोटी कमावले?

Dhurandhar vs Avatar-Fire and Ash Box Office Collection : रणवीर सिंहच्या 'धुरंधर' चित्रपटाने 'अवतार'ला मागे टाकले आहे. 'अवतार' चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमावले, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'धुरंधर' चित्रपट 5 डिसेंबर 2025 ला थिएटरमध्ये रिलीज झाला.

'अवतार: फायर अँड ॲश' चित्रपट 19 डिसेंबर 2025ला प्रदर्शित झाला आहे.

'धुरंधर' चित्रपटाने 'अवतार: फायर अँड ॲश' सिनेमाला पहिल्याच दिवशी मागे टाकले आहे.

गेले दोन आठवडे बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर'चा डंका पाहायला मिळत आहे. 'धुरंधर' लवकरच 500 कोटींचा टप्पा ओलांडणार आहे. आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' चित्रपट 5 डिसेंबर 2025 ला थिएटरमध्ये रिलीज झाला. कंधार अपहरण आणि २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यांसह अनेक सत्य घटनांपासून चित्रपट प्रेरित आहे. तर आता 19 डिसेंबर 2025 ला जेम्स कॅमेरॉनचा 'अवतार: फायर अँड ॲश' रिलीज झाला आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. दोन्ही चित्रपटांचे कलेक्शन जाणून घेऊयात.

'धुरंधर' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 15

Sacnilk च्या रिपोर्टनुसारनुसार, 'धुरंधर'ने तिसऱ्या शुक्रवारी म्हणजे 15 व्या दिवशी 22.50 कोटी रुपये कमावले आहे. आतापर्यंत चित्रपटाने एकूण 483.00 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. 'धुरंधर' 500 कोटींपासून काही पावले दूर आहे. 'धुरंधर'ने पहिल्या आठवड्यात 207.25 कोटी रुपये, दुसऱ्या आठवड्यात 253.25 कोटी रूपयांची कमाई केली आहे. तर जगभरात चित्रपटाने 730 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. तर या वीकेंडला 'धुरंधर' बॉक्स ऑफिसवर 500 कोटींचा टप्पा ओलांडेल, अशी शक्यता आहे.

  • पहिला दिवस - 28 कोटी रुपये

  • दुसरा दिवस - 32 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 43 कोटी रुपये

  • चौथा दिवस - 23.25 कोटी रुपये

  • पाचवा दिवस - 27 कोटी रुपये

  • सहावा दिवस - 27 कोटी रुपये

  • सातवा दिवस -27 कोटी रुपये

  • आठवा दिवस - 32.5 कोटी रुपये

  • नववा दिवस - 53 कोटी रुपये

  • दहावा दिवस -58 कोटी रुपये

  • अकरावा दिवस - 30.5 कोटी रुपये

  • बारावा दिवस - 30.00 कोटी रुपये

  • तेरावा दिवस - 25.5 कोटी रुपये

  • चौदावा दिवस - 23.25 कोटी रुपये

  • पंधरावा दिवस - 22.50 कोटी रुपये

  • एकूण - 483.00 कोटी रुपये

'अवतार' बॉक्स ऑफिस कलेक्शन

जेम्स कॅमेरॉनचा 'अवतार: फायर अँड ॲश' हा चित्रपट अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा 'अवतार' फ्रँचायझीचा तिसरा भाग आहे. चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली आहे. Sacnilk च्या रिपोर्टनुसारनुसार,'अवतार' ने पहिल्या दिवशी भारतात 20 कोटींचा गल्ला जमवला. तर जागतिक स्तरावर 500 कोटींवर व्यवसाय केला. त्यामुळे 'अवतार' पहिल्या दिवसापासून 'धुरंधर' ला तगडी टक्कर देत आहे.

जेम्सच्या चित्रपटाचा पहिला भागाचे नाव 'अवतार', दुसरा भागाचे नाव 'अवतार: द वे ऑफ वॉटर' आणि तिसऱ्या भागाचे नाव 'अवतार: फायर अँड अॅश' असं आहे. या चित्रपटात VFXचा भन्नाट वापर करण्यात आला आहे. 'अवतार' सिनेमॅटोग्राफीचा उत्तम नमुना आहे. 'अवतार: फायर अँड ॲश' भारतात इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगु, मल्याळम आणि कन्नड अशा सहा भाषांमध्ये रिलीज झाला आहे.

  • 6 भाषांमध्ये पहिल्या दिवसाची कमाई

  • इंग्रजी - 9 कोटी रुपये

  • हिंदी - 5.5 कोटी रुपये

  • तमिळ - 2.6 कोटी रुपये

  • तेलुगु- 2.85 कोटी रुपये

  • मल्याळम - 2 लाख

  • कन्नड - 8 लाख

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लाडक्या बहिणींना नवीन वर्षाचं गिफ्ट, 2100 नाहीतर 4500 मिळणार|VIDEO

Maharashtra Politics: अंबरनाथमध्ये EVM आणणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे बोगस आयडी कार्ड, शिवसेना-काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

Anushka Sharma Looks Like: 'वहिनीपेक्षा ही क्युट...'; पाकिस्तानी तरुणी दिसते सेम अनुष्कासारखी, व्हिडिओ पाहून विराटला केलं टॅग

Pune : ठाकरे, पवारांची एकमेकांवर टीका जेवायला मात्र एकत्र असायचे, पण आता...तावडेंनी बोलून दाखवली खंत

Pune Politics: पुण्यात शिंदेगटाला मोठं खिंडार, नाराज पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

SCROLL FOR NEXT