Rakesh Bedi: आदित्य धर यांच्या नवीनतम हिट चित्रपट 'धुरंधर' मध्ये राकेश बेदी धूर्त राजकारणी जमील जमालीची भूमिका साकारत आहेत. २० वर्षीय अभिनेत्री सारा अर्जुन त्यांची मुलगी येलिना जमालीची भूमिका साकारत आहे. दरम्यान, धुरंधर ट्रेलर लाँच कार्यक्रमातील दोघांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. त्यामुळे अभिनेता मोठ्या प्रमाणात ट्रोल झाले. व्हिडिओमध्ये राकेश साराकडे जातो आणि तिला मिठी मारतो. त्यानंतर तो तिच्या खांद्याला किस करतो. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर मोठ्या प्रमाणात अभिनेता ट्रोल झाला.
वडील आणि मुलीची भूमिका साकारली
राकेश बेदी यांनी हिंदुस्तान टाईम्सला उत्तर देताना म्हटले की, "सारा माझ्यापेक्षा लहान आहे आणि माझ्या मुलीची भूमिका साकारत आहे. आम्ही जेव्हा जेव्हा सेटवर भेटायचो तेव्हा आम्ही एकमेकांना बाप-लेकीसारखी मिठी मारायचो. आमचे चांगले नाते आहे आणि आम्ही मित्र आहोत, जे पडद्यावर दिसून येते." अभिनेत्याने पुढे स्पष्ट केले की त्याने कार्यक्रमाच्या दिवशी तिचे स्वागत त्याच प्रेमाने केले होते, जे सोशल मिडीयावर पूर्णपणे बदलले होते. ते म्हणाले, "मी तिला तसाच भेटलो पण जर दोष पाहणाऱ्याच्या नजरेत असेल तर काय करता येईल?
राकेश बेदी म्हणाले
याव्यतिरिक्त, राकेश बेदी यांनी धुरंधरच्या टीझर लाँचमध्ये उपस्थित असलेल्या साराचे पालक राज अर्जुन आणि सान्या यांच्याबद्दलही बोलले. ते म्हणाले, "मी वाईट हेतूने तिला का किस करु? तेही सर्वांसमोर स्टेजवर. जेव्हा तिचे पालक समोर असताना
धुरंधर हा चित्रपट खूप गाजत आहे. आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंह, संजय दत्त, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, आर माधवन, राकेश बेदी हे तगडे कलाकार झळकले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.