Dhurandhar Collection saam tv
मनोरंजन बातम्या

Dhurandhar Collection : 'धुरंधर'ला तगडी टक्कर द्यायला येतोय 'अवतार', रणवीर सिंहचा चित्रपट 500 कोटींपासून काही पावले दूर

Dhurandhar Box Office Collection Day 13 : रणवीर सिंहचा 'धुरंधर' चित्रपट 500 कोटींच्या उंबरठ्यावर आहे. 'धुरंधर'ला तगडी टक्कर देण्यासाठी 'अवतार' चित्रपट येत आहे.

Shreya Maskar

'धुरंधर' चित्रपट 5 डिसेंबर 2025 ला थिएटरमध्ये रिलीज झाला.

'अवतार: फायर अँड ॲश' चित्रपट 19 डिसेंबर 2025 ला रिलीज होणार आहे.

'धुरंधर' लवकरच 500 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करेल.

'धुरंधर' चित्रपट जगभरात गाजत आहे. या चित्रपटातील डायलॉग, गाणी, कलाकारांचा अभिनय सर्वांचे कौतुक होत आहे. 'धुरंधर' चित्रपट 5 डिसेंबर 2025 ला थिएटरमध्ये रिलीज झाला. कंधार अपहरण आणि २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यांसह अनेक सत्य घटनांपासून चित्रपट प्रेरित आहे. धुरंधर' चित्रपट आदित्य धर याचा आहे. चित्रपटाने 13 दिवसांत किती कोटींचा व्यवसाय केला, जाणून घेऊयात.

'धुरंधर' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 13

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'धुरंधर' चित्रपटाने 13 व्या दिवशी म्हणजे दुसऱ्या गुरुवारी 25.5 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. आतापर्यंत सिनेमाने जवळपास 437.25 कोटी रुपये कमावले. 'धुरंधर' लवकरच 500 कोटींचा टप्पा पार करेल. रणवीर सिंह आणि अक्षय खन्नाच्या चित्रपटाने जगभरात 634 कोटी रुपयांची कमाई केली. लवकरच हा आकडा 700-800 कोटींवर जाईल.

  • पहिला दिवस - 28 कोटी रुपये

  • दुसरा दिवस - 32 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 43 कोटी रुपये

  • चौथा दिवस - 23.25 कोटी रुपये

  • पाचवा दिवस - 27 कोटी रुपये

  • सहावा दिवस - 27 कोटी रुपये

  • सातवा दिवस -27 कोटी रुपये

  • आठवा दिवस - 32.5 कोटी रुपये

  • नववा दिवस - 53 कोटी रुपये

  • दहावा दिवस -58 कोटी रुपये

  • अकरावा दिवस - 30.5 कोटी रुपये

  • बारावा दिवस - 30.00 कोटी रुपये

  • तेरावा दिवस - 25.5 कोटी रुपये

  • एकूण - 437.25 कोटी रुपये

रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

'धुरंधर'ने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. 'धुरंधर' हा हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील असा पहिला चित्रपट ठरला आहे, ज्याने दुसऱ्या आठवड्यात ₹ 200 कोटींचा टप्पा पार केला. याआधी हा रेकॉर्ड 'पुष्पा 2'ने ब्रेक केला होता. 'धुरंधर' समोर आता 'अवतार' चे मोठे आव्हान पाहायला मिळणार आहे. 'अवतार: फायर अँड ॲश' चित्रपट 19 डिसेंबर 2025 ला रिलीज होणार आहे. दोन्ही चित्रपट एकमेकांना तगडी टक्कर देतील असे बोले जात आहे.

'धुरंधर' चित्रपटात रणवीर सिंहसोबत संजय दत्त, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन, अक्षय खन्ना, आर माधवन, राकेश बेदी हे तगडे कलाकार झळकले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, 'धुरंधर' चित्रपटाचे बजेट 250 कोटींच्या अधिक आहे. 'धुरंधर' हा ॲक्शन चित्रपट आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT