Dhurandhar: 'धुरंधर'नं मोडली दक्षिणेची मक्तेदारी; बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर'ची 400 कोटींची कमाई

Dhurandhar: 2025 चं वर्ष अखेर बॉलिवुडसाठी छप्पर फाड ठरल आहे. कारण डिसेंबर महिन्यात प्रदर्शित झालेल्या धुरंधरनं वर्षभरात बॉक्स ऑफीसवर मोठी कमाई केली आहे.
Dhurandhar
DhurandharSaam Tv
Published On

Dhurandhar: 2025 चं वर्ष अखेर बॉलिवुडसाठी छप्पर फाड ठरल आहे. कारण डिसेंबर महिन्यात प्रदर्शित झालेल्या धुरंधरनं वर्षभरात बॉक्स ऑफीसवर रेकॉर्ड करणाऱ्या सगळ्यांनाच धुवून काढलंय. रणवीर सिंग, अक्षय खन्ना, आर. माधवन, संजय दत्त, अशा तगड्या कलाकारांची फौज असणारा धुरंधर सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाल करतोय.

आदित्य धर दिग्दर्शित हा सिनेमा कमाईच्या बाबतीत रोज नवे विक्रम रचतो आहे. देशभरात आत्तापर्यंत 400 कोटींचा आकडा पार केलाय. खास करुन अक्षय खन्नाने साकारलेलं रहमान डकैत हे पात्र चर्चेत आहे.

Dhurandhar
Ankita Walawalkar: 'स्पायवर मस्करी करून रिल बनवणं...'; अंकिता वालावलकर धुरंधरच्या 'त्या' ट्रेंडवर संतापली, म्हणाली...

या सिनेमांचं 12 व्या दिवसाचं कलेक्शन दक्षिणेतील अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा: द रुल - भाग 2'पेक्षाही जास्त आहे. याचवर्षी विकी कौशलच्या छावा सिनेमानेही सुमारे 800 कोटींची कमाई केली होती. 'कांतारा' या कन्नड सिनेमानेही देशभरातल्या प्रेक्षकांना भूरळ घातली होती.

Dhurandhar
Co-ord Sets: ऑफिस आणि कॉलेज वेअरसाठी ट्राय करा कम्फर्टेबल आणि ट्रेंडी को-ऑर्ड सेट्स, तिन्ही सिझनसाठी परफेक्ट चॉईस

त्यामुळे केवळ साऊथचेच सिनेमे हिट होतात हा दावा छावा आणि धुरंधरच्या यशानं खोटा ठरवलाय. सैय्यारानेही तरुणाईची मने जिंकत बॉक्स ऑफिसवर यश मिळवलं होतं. त्यामुळे बॉलिवुडने पुन्हा एकदा बॉक्स ऑफीसवरचा आपला दबदबा कायम ठेवलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com