Ankita Walawalkar: 'स्पायवर मस्करी करून रिल बनवणं...'; अंकिता वालावलकर धुरंधरच्या 'त्या' ट्रेंडवर संतापली, म्हणाली...

Ankita Walawalkar On Dhurandhar Movie Trend: धुरंधर सिनेमावर सुरू असलेल्या ‘Day 1 As a Spy in Pakistan’ या व्हायरल ट्रेंडवर कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकरने संताप व्यक्त केला. सोशल मीडियावरील रील्समधून देशसेवेची थट्टा होत असल्याचे तिने स्पष्ट केले.
Ankita Walawalkar On Dhurandhar Movie Trend
Ankita Walawalkar On Dhurandhar Movie TrendSaam Tv
Published On

Ankita Walawalkar On Dhurandhar Movie Trend: सोशल मीडियावर सध्या आदित्य धर दिग्दर्शित “धुरंधर” हा ब्लॉकबस्टर स्पाय थ्रिलर चर्चेत आहे. रणवीर सिंह, अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जुन रामपाल आणि अनेक दमदार कलाकारांच्या अभिनयामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई करत आहे.

धुरंधर चित्रपटाबद्दल ‘Day 1 As a Spy in Pakistan’ असा एक व्हायरल सोशल मीडिया ट्रेंड सुरू झाला आहे. या ट्रेंडमध्ये इन्फ्लुएन्सर्स आणि यूजर्स आपल्या पहिल्या दिवशी पाकिस्तानमध्ये गुप्तहेर म्हणून कसे पकडले जाऊ शकतात हे विनोदी रील्स करत आहेत. रोजच्या भारतीय सवयी, खाद्यपदार्थ किंवा वर्तनामुळे ते भारतीय आहेत हे सहज ओळखले जाऊ शकतात, अशा प्रकारचे मजेशीर व्हिडिओज शेअर केले जात आहेत.

Ankita Walawalkar On Dhurandhar Movie Trend
Radhika Apte: 'माझी प्रेग्नेंसी धक्कादायक होती', 'ही' मराठमोळी अभिनेत्री प्रेग्नेट होण्यासाठी नव्हती तयार

मात्र, या ट्रेंडवर मराठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ‘कोकण हार्टेड गर्ल’ म्हणजे अंकिता वालावलकरने तीव्र संताप आणि नाराजी व्यक्त केली आहे. तिने आपल्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत म्हटले की, “Spy वर मस्करी करून reel बनवणं म्हणजे विनोद नाही तर अज्ञान आहे.” तिने स्पष्टपणे सांगितले की, देशासाठी सेवा देणाऱ्या गुप्तहेरांच्या धैर्य, बुद्धी आणि त्यागाचा हा विनोदी वापर संवेदनशून्य आणि अनुचित आहे.  एकदा स्वतःला त्यांच्या जागी ठेवून बघा. नाव विसरावं लागतं, कुटुंब विसरावं लागतं, आणि तरीही देश पहिला. व्ह्यू मिळतील तुम्हाला, पण लाज उरायला हवी..."

Ankita Walawalkar On Dhurandhar Movie Trend
Akshaye Khanna Dance: अक्षय खन्नानं २० वर्षांपूर्वीच्या चित्रपटातही केली होती 'धुरंधर'मधील FA9LA ची डान्स स्टेप, व्हिडिओ होतोय व्हायरल

अंकिताचा हा प्रतिसाद केवळ मनोरंजनापुरता मर्यादीत नाही. तिने म्हटले की अशी व्हिडीओ ट्रेंड्स तयार करून फक्त व्ह्यू आणि लाइक्स मिळवण्याचा मानस आहे, पण या प्रकारच्या गंभीर विषयांकडे योग्य प्रकारे पाहणे गरजेचे आहे. धुरंधर या चित्रपटाचा विषय भारतीय गुप्तचर, देशभक्ती आणि आंतरराष्ट्रीय थ्रिलरच्या रूपात सादर केला गेला आहे. तसेच २०२६मध्ये या चित्रपटाचा पुढचा भाग प्रदर्शित होणार आहे.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com