Shruti Vilas Kadam
अभिनेत्री राधिका आपटेने सांगितले की प्रेग्नेट झाल्याचे कळताच त्यांना मोठा धक्का बसला. कारण तिने आणि तिच्या पतीने कधीही बेबी प्लॅन केले नव्हते.
राधिकाने खुलासा केला की एका भारतीय निर्मात्याला त्यांच्या प्रेग्नेंसीबद्दल समजताच तिच्याशी नीट वागणं बंद केलं आणि तिच्या गरजांकडे दुर्लक्ष करण्यात आले.
गर्भावस्थेत शरीर अस्वस्थ आणि फुगलेले असतानाही निर्मात्याने राधिकाला टाइट कपडे घालण्यास सांगितले, यामुळे त्यांना मानसिक आणि शारीरिक त्रास झाला.
गर्भधारणेच्या पहिल्या त्रैमासिकात राधिकाला भूक न लागणे आणि पचनाशी संबंधित त्रास जाणवत होते.
अस्वस्थता आणि वेदना असूनही राधिकाला डॉक्टरकडे जाण्याची परवानगी देण्यात आली नाही.
राधिकाने स्पष्ट केले की तिने कोणत्याही विशेष सुविधा मागितल्या नव्हत्या. तिला केवळ थोडी समज, सहानुभूती आणि माणुसकी अपेक्षित होती.
जिथे भारतीय निर्मात्याकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नाही, तिथे आंतरराष्ट्रीय दिग्दर्शक आणि टीमने राधिकाला पूर्ण पाठिंबा दिला आणि तिची पूर्ण काळजी घेतली.