Shruti Vilas Kadam
‘धुरंधर’ या मालिकेत उजैर बलोच हे पात्र रहमान डकैतचे चुलत भाऊ आणि त्याचा राईट हँड म्हणून दाखवले आहे.
उजैर बलोचची भूमिका अभिनेता दानिश पंडोरने (Danish Pandor) साकारली आहे.
दानिश पंडोरने अनेक वर्षे संघर्ष करत अभिनय क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले. त्याच्या मेहनतीमुळे आणि सातत्यपूर्ण कामामुळे त्याला आता ओळख आणि प्रसिद्धी मिळाली आहे.
‘धुरंधर’पूर्वी दानिश यांनी ‘छावा’ सारख्या मोठ्या चित्रपटात काम केले आहे. मात्र ‘धुरंधर’मधील भूमिकेमुळे त्याला विशेष ओळख मिळाली.
दानिश पंडोरने ‘कितनी मोहब्बत है’, ‘एजंट राघव’, ‘इश्कबाज’ यांसारख्या लोकप्रिय दूरदर्शन मालिका आणि वेब शोमध्येही अभिनय केला आहे.
दानिश पंडोरला आपल्या करिअरदरम्यान कास्टिंग काउचसारख्या कटू अनुभवाला सामोरे जावे लागले, मात्र त्याने हार न मानता पुढे वाटचाल सुरू ठेवली.
उजैर बलोच हा रहमान डकैतच्या टोळीच्या दैनंदिन कामकाजात आणि रणनीती आखण्यात महत्त्वाची भूमिका साकारणार व्यक्ती होता.