Dhurandhar Collection : 'धुरंधर'ची ४०० कोटींकडे वाटचाल; 'छावा'चा रेकॉर्ड मोडणार? कपिलचा चित्रपट तिकीट खिडकीवर आपटला, वाचा कलेक्शन

Dhurandhar vs Kis Kisko Pyaar Karoon 2 Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर रणवीर सिंहचा 'धुरंधर' चित्रपट गाजत आहे. 'धुरंधर' लवकरच 400 कोटींचा टप्पा पार करणार आहे. चित्रपटाचे कलेक्शन जाणून घेऊयात.
Dhurandhar vs Kis Kisko Pyaar Karoon 2 Box Office Collection
Dhurandhar Collection saam tv
Published On
Summary

'धुरंधर' चित्रपट 5 डिसेंबर 2025 ला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे.

'किस किसको प्यार करू 2' च्या कमाईत सतत घसरण होताना दिसत आहे.

'धुरंधर' चित्रपट 'छावा'ला तगडी टक्कर देत आहे.

विकी कौशलचा 'छावा'2025 चा सर्वात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. आता 'छावा'ला रणवीर सिंहचा 'धुरंधर' तगडी टक्कर देत आहे. 'धुरंधर' लवकरच 400 कोटींचा टप्पा ओलांडणार आहे. 'धुरंधर' चित्रपट 5 डिसेंबर 2025 ला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. कंधार अपहरण आणि २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यांसह अनेक सत्य घटनांपासून चित्रपट प्रेरित आहे. 'धुरंधर' सोबत बॉक्स ऑफिसवर कपिल शर्माचा 'किस किसको प्यार करू 2' देखील पाहायला मिळत आहे. दोघांचे कलेक्शन जाणून घेऊयात.

'धुरंधर' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 11

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'धुरंधर' चित्रपटाने दुसऱ्या सोमवारी 29 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. सिनेमाची एकूण कमाई जवळपास 382.98 कोटी झाली आहे. 'धुरंधर'ची जगभरातील कमाई जवळपास 544 कोटी रुपये झाली आहे. चित्रपट लवकरच 550 कोटी रुपयांचा टप्पा गाठेल.

  • पहिला दिवस - 28 कोटी रुपये

  • दुसरा दिवस - 32 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 43 कोटी रुपये

  • चौथा दिवस - 23.25 कोटी रुपये

  • पाचवा दिवस - 27 कोटी रुपये

  • सहावा दिवस - 27 कोटी रुपये

  • सातवा दिवस -27 कोटी रुपये

  • आठवा दिवस - 32.5 कोटी रुपये

  • नववा दिवस - 53 कोटी रुपये

  • दहावा दिवस -58 कोटी रुपये

  • अकरावा दिवस - 29 कोटी रुपये

  • एकूण - 382.98 कोटी रुपये

'किस किसको प्यार करू 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 4

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, कपिल शर्माच्या 'किस किसको प्यार करू 2'ने चौथ्या दिवशी 90 लाख रुपयांची कमाई केली असून चित्रपटाचे एकूण कलेक्शन 8.15 कोटी रुपये झाले आहे. कपिल शर्माच्या 'किस किसको प्यार करू 2' मध्ये त्रिधा चौधरी, आयशा खान, वारिना हुसेन, पारुल गुलाटी आणि मनजोत सिंग हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसले आहेत.

  • पहिला दिवस - 1.85 कोटी रुपये

  • दुसरा दिवस - 2.5 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 2.9 कोटी रुपये

  • चौथा दिवस - 0.90 लाख रुपये

  • एकूण - 8.15 कोटी रुपये

Dhurandhar vs Kis Kisko Pyaar Karoon 2 Box Office Collection
Marathi Movie Teaser: 'अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?'; निर्मिती सावंत - प्रार्थना बेहेरे उलगडणार सासू-सुनेचं खट्याळ नातं, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com