'धुरंधर: द रिव्हेंज' चित्रपट 19 मार्च 2026 ला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
रणवीर सिंहच्या 'धुरंधर २' ने १००० कोटी कमावून इतिहास रचला आहे.
आदित्य धरच्या चित्रपटाने जगभरातही छप्परफाड कमाई केली आहे.
रणवीर सिंहच्या 'धुरंधर २' ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड पाहायला मिळत आहे. आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर: द रिव्हेंज' चित्रपटाने जगभरात बक्कळ कमाई केली आहे. 'धुरंधर: द रिव्हेंज' चित्रपट 19 मार्च 2026 ला रिलीज झाला आहे. 'धुरंधर २' हा चित्रपट पाच भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. यात हिंदी, कन्नड, मल्याळ, तेलुगु आणि तमिळ यांचा समावेश आहे. रहमान डकैतच्या मृत्यूनंतर पुढे काय घडते, याचा उलगडा 'धुरंधर 2'मध्ये होतो.
'धुरंधर २' च्या रिलीजच्या १८ व्या दिवशी कमाईत लक्षणीय वाढ झाली, ज्यामुळे त्याचे जगभरातील एकूण कलेक्शन १,६०० कोटी रुपयांच्याही पुढे गेले. दुसरीकडे, चित्रपटाच्या भारतातील नेट कमाईनेही १,००० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, १९ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या 'धुरंधर २' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १८ दिवसात १,००० कोटी रुपयांहून अधिक कमाई केली आहे. तिसऱ्या रविवारी म्हणजे १८ व्या दिवशी रणवीर सिंगच्या चित्रपटाने २८.७५ कोटी रुपयांची कमाई केली. रविवार 'धुरंधर: द रिव्हेंज'ची भारतातील नेट कमाई १,०१३.७७ कोटी रुपयांवर पोहोचली.
'धुरंधर: द रिव्हेंज' या चित्रपटाचे जगभरातील एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन १,६०५.७५ कोटी रुपये कमावले आहेत. यामध्ये भारतातील १,२१३.७४ कोटी रुपयांच्या एकूण (gross) व्यवसायाचा आणि ३९२ कोटी रुपयांच्या परदेशातील कमाईचा समावेश आहे. १८ व्या दिवशी, 'धुरंधर २' ने आंतरराष्ट्रीय कमाईमध्ये आणखी ७ कोटी रुपयांची भर घातली. 'धुरंधर २' ने १००० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. असे करणारा हा पहिला बॉलिवूड चित्रपट ठरला आहे. 'धुरंधर २' ने १००० कोटींमध्ये एन्ट्री करून मोठा इतिहास रचला आहे.
'धुरंधर 2' चित्रपटाची कथा भारताचा गुप्तहेर असलेल्या आणि पूर्वी 'जसकीरत सिंह रंगी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हमझा अली माझारीच्या प्रवासाची आहे. 'धुरंधर' 5 डिसेंबर 2025 रिलीज झाला होता. 'धुरंधर' मध्ये रणवीर सिंगसोबत सारा अर्जुन, सारा अर्जुन, आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, अक्षय खन्ना हे कलाकार झळकले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.