Dhurandhar 2 OTT Release SAAM TV
मनोरंजन बातम्या

Dhurandhar 2 OTT Release : 'धुरंधर 2'चा अनोखा अवतार पाहा मोबाइलवर; रणवीर घेऊन येतोय मोठा ट्विस्ट, ओटीटीवर कुठे अन् कधी पाहाल?

Dhurandhar 2 The Revenge OTT Release Update : थिएटरमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर रणवीर सिंहचा 'धुरंधर 2' आता ओटीटीवर रिलीज होणार आहे. चित्रपटाचे ओटीटी अपडेट वाचा.

Shreya Maskar

'धुरंधर २' चित्रपट 19 मार्चला थिएटरमध्ये रिलीज झाला.

रणवीर सिंहचा 'धुरंधर २' आता ओटीटीवर येतोय.

'धुरंधर २' आदित्य धर दिग्दर्शित चित्रपट आहे.

बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर रणवीर सिंहचा 'धुरंधर २: द रिव्हेंज' आता ओटीटीवर येण्यासाठी सज्ज झाला आहे. 'धुरंधर २' च्या ओटीटी रिलीजचे अपडेट समोर आले आहे. ओटीटी (OTT) साइट्सवर या चित्रपटाचे 'टायटल कार्ड' झळकत असल्याचे सांगत, चाहत्यांनी त्याचे स्क्रीनशॉट्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केले आहेत. ज्यामुळे 'धुरंधर २' ओटीटी रिलीजची चर्चा चांगलीच रंगली आहे. 'धुरंधर २' चित्रपट 19 मार्चला थिएटरमध्ये रिलीज झाला.

ओटीटी रिलीज अपडेट

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टनुसार, 'धुरंधर २' थिएटरमध्ये ८ आठवड्यांचा यशस्वी प्रवास पूर्ण केल्यानंतर आदित्य धरचा हा सुपरहिट चित्रपट १५ मे रोजी ओटीटीवर स्ट्रिमिंग होणार आहे. टायटल कार्डवरील माहितीनुसार, 'धुरंधर: द रिव्हेंज (रॉ अँड अनदेखाह)' (Raw and Undekha) या शीर्षकासह प्रदर्शित होणार आहे. १५ मे रोजी मध्यरात्री १२:०० वाजल्यापासून याचे स्ट्रिमिंग सुरू होणार असल्याचे बोले जात आहे.

'धुरंधर २' चित्रपटाची डिजिटल आवृत्ती HD आणि 4K फॉरमॅटमध्ये, तसेच Dolby 5.1 ऑडिओ सपोर्टसह उपलब्ध असेल. ओटीटी आवृत्तीचा एकूण कालावधी ३ तास, ५२ मिनिटे आणि २४ सेकंद इतका असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यावरून, भारतीय चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या आवृत्तीपेक्षा यात काही अतिरिक्त दृश्ये (फुटेज) किंवा एक विस्तारित, 'अनसेन्सर्ड' आवृत्ती समाविष्ट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा चित्रपट भारतात 'जिओ हॉटस्टार' वर प्रदर्शित होईल, तर आंतरराष्ट्रीय प्रेक्षक 'नेटफ्लिक्स' वर चित्रपट पाहू शकतात. मात्र अद्याप चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची कोणतीही अधिकृत घोषणा झाली नाही.

'धुरंधर २' बॉक्स ऑफिस कलेक्शन

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर २' चित्रपटाने भारतात १,१४० कोटी रुपयांचा नेट कमाई केली, तर जगभरात १,७९१ कोटी रुपयांहून अधिक कमाई केली. 'धुरंधर 2' चित्रपटाची कथा भारताचा गुप्तहेर असलेल्या आणि पूर्वी 'जसकीरत सिंह रंगी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हमझा अली माझारीच्या प्रवासाची आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

No Makeup Look: सणासुदीला कमी मेकअपमध्ये दिसाल एकदम ग्लोईंग; नो-मेकअप लूकची 'ही' ट्रिक नक्की करा

Eyebrow : आयब्रो केल्यानंतर स्किनवर छोटे लाल दाणे दिसतात? तर करा हे उपाय

Belapur Tourism : पावसाळ्यात फिरण्याची हौस असेल तर बेलापूरजवळची 'ही' ५ ठिकाणं मिस करू नका!

Maharashtra News Live Update: उल्हासनगरच्या महापौरांच्या जनता दरबारात जोरदार गोंधळ

DJ Noise Health Risks: गणपतीत डीजेच्या आवाजापासून स्वतःला कसे सुरक्षित ठेवाल? 5 टिप्स वाचा

SCROLL FOR NEXT