Chal Karu Tayari Song Released Saam TV
मनोरंजन बातम्या

Dharmaveer 2 Song: "चल करूया तयारी...", 'धर्मवीर २' मधील गाणं रिलीज; घडणार आनंद दिघे यांच्या सामाजिक कार्याचे दर्शन

Chal Karu Tayari Song Released From Dharmaveer 2 Movie: ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये गाणं रिलीज झालं आहे. "चल करूया तयारी" हे गाणं रिलीज झालेलं आहे.

Chetan Bodke

प्रेक्षकांमध्ये धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनपटाची जोरदार चर्चा होताना पाहायला मिळत आहे. 'धर्मवीर २' साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटाचा गेल्या काही दिवसांपूर्वी मोशन पोस्टर आणि टीझर रिलीज झाला होता. आता चित्रपटातलं पहिलं गाणंही रिलीज झालं आहे. म्युझिक लाँचिंग इव्हेंटचं आयोजन करीत चित्रपटातलं गाणं रिलीज करण्यात आलं आहे. ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये गाणं रिलीज झालं आहे. "चल करूया तयारी" हे गाणं रिलीज झालेलं आहे.

"चल करूया तयारी" हे गाणं नुकतंच रिलीज झालं असून विशाल ददलानी आणि बेला शेंडेने गायलं आहे. अविनाश आणि विश्वजीतने हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. तर डॉ. प्रसाद बिवारेने गाणं लिहिलं आहे. या गाण्यामध्ये, आनंद दिघे यांचे शालेय विद्यार्थांप्रती असलेले प्रेम पाहायला मिळत आहे. स्व. धर्मवीर आनंद दिघे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दित अनेक सामाजिक कार्य केलेले आहेत, हे सर्वांना सर्वश्रुत आहे. हे गाणं त्यांच्यावर आणि शालेय विद्यार्थांवर चित्रित करण्यात आले आहे. हे गाणं रिलीज होताच सोशल मीडियावर प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

गीतकार मंगेश कांगणे, स्नेहल तरडे, डॉक्टर प्रसाद बिवरे, विश्वजीत जोशी यांनी चित्रपटातील लिहिलेल्या गाण्यांना अविनाश - विश्वजीत आणि चिनार-महेश यांचे सुमधुर संगीत लाभले आहे. तर चित्रपटातील गाणी सुप्रसिद्ध गायक हरिहरन, जावेद अली, सुखविंदर सिंग, विशाल दादलानी, आदर्श शिंदे, मनीष राजगिरे आणि सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे यांच्या आवाजात गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहेत.

चित्रपटामध्ये धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका दिग्दर्शक आणि अभिनेता प्रसाद ओकने साकारली आहे. चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई,उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे कथा,पटकथा,संवाद आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनीच निभावली असून कॅमेरामन म्हणून महेश लिमये यांनी काम पाहिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धुळे तालुका पोलिसांनी आंतरराज्यीय घरफोडी करणारी टोळी केली जेरबंद

माणिकराव कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार, समर्थकांचा मोठ्या संख्येने कोर्टाबाहेर जमाव|VIDEO

सगळ्यांना खदखदून हसवणारी कॉमेडी क्वीन दुसऱ्यांना झाली आई; शुटिंगला जाताना आल्या प्रसृती कळा

Phone Scam: मोबाइल फोन सारखा ट्रिंग ट्रिंग करतोय, मोठा फ्रॉड होण्याचा धोका, हे 5 संकेत आधीच ओळखा

Dhurandhar Cast Net Worth: रणवीर सिंग, अक्षय खन्ना की संजय दत्त, जाणून घ्या कोणता धुरंधर आहे सर्वात श्रीमंत

SCROLL FOR NEXT