Dhanush In AR Rahmans concert Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dhanush: एआर रहमानच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये धनुषची सरप्राईज एन्ट्री, चाहत्यांसाठी बनली खास भेट

Dhanush In AR Rahmans concert: एआर रहमानच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये अचानक एन्ट्री करून दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषने प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले. यादरम्यान, अभिनेत्याने ऑस्कर विजेत्या संगीतकारासोबत लाईव्ह परफॉर्मन्स दिला.

Shruti Vilas Kadam

Dhanush In AR Rahmans concert: ऑस्कर विजेते संगीतकार ए.आर. रहमान यांनी नवी मुंबईत द वंडरमेंट टूर ग्लोबल प्रीमियरचा भाग म्हणून एक शानदार लाईव्ह कॉन्सर्ट केला. ए.आर. रहमान यांना ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने लोक आले होते. चाहते लाईव्ह परफॉर्मन्सचा आनंद घेत असताना, त्यांना एक असा धक्का बसला ज्याची कल्पनाही लाईव्ह कॉन्सर्ट पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांनी केली नसेल.

धनुषने केली आश्चर्यचकित करणारी एन्ट्री

खरंतर, काल रात्री ए.आर. रहमान नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये आपल्या संगीताने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत होते. प्रेक्षक सादरीकरणाचा आनंद घेत होते आणि त्यानंतर अभिनेता धनुषने स्टेजवर प्रवेश करून सर्वांना आश्चर्यचकित केले. यादरम्यान, अभिनेत्याने त्याच्या आवडत्या संगीतकाराचे कौतुक केले आणि म्हणाला, "तुम्ही जे काम करता ते अविश्वसनीय आहे. ते खरोखरच अद्भुत आहे."

यावर उत्तर देताना ए.आर. रहमानने धनुषचे आभार मानले आणि म्हणाला, "मी माइक चेक करतो. मला वाटतंय माझ्याकडे बघून माइक घाबरला आहे. यावर धनुष हसतो. यानंतर, धनुषने त्याच्या 'रायन' चित्रपटातील 'अदंगथा असुरन' हे गाणे गायले जे रहमान यांनी संगीतबद्ध केले होते. या कार्यक्रमानंतर धनुषने एक फोटोही शेअर केला आहे.

चाहत्यांनी आनंद घेतला

नवी मुंबईत झालेल्या या संगीत कार्यक्रमाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका युजरने एआर रहमान आणि धनुष यांना आयकॉनिक स्टार म्हटले. दुसऱ्या युजरने लिहिले की हे खूप मोठे आश्चर्य होते. एका युजरने लिहिले की, दोघांनीही एकत्र आणखी बरेच शो करायला हवेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT