Panchayat: फुलेरा गावात होणार निवडणूक; रंगणार सचिवजी-रिंकीची लव्हस्टोरी; पंचायतचा टिझर रिलीज

panchayat season 4: 'पंचायत' या लोकप्रिय वेब सीरीजचा चौथा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आज या सिझनचा मजेशीर टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.
Panchayat Season 4
Panchayat Season 4Saam Tv
Published On

Panchayat Web series: 'पंचायत' या लोकप्रिय वेब सीरीजचा चौथा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 3 मे 2025 रोजी या सिझनचा टीझर प्रदर्शित करण्यात आला असून, फुलेरा गावात होणाऱ्या सर्वात मोठ्या पंचायत निवडणुकीची झलक यात पाहायला मिळते. या निवडणुकीत प्रधानजी (रघुबीर यादव) आणि भूषण (दुर्गेश कुमार) यांच्यात थेट सामना होणार आहे. टीझरमध्ये प्रचाराच्या गोंधळात, मतदारांच्या रांगा, विधायकजींचा डान्स आणि सचिवजी-रिंकीच्या लव्हस्टोरीची सुरुवात अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे.

या सिझनमध्ये फुलेरा गावातील राजकारण अधिक तापलेले दिसणार आहे. प्रधानजी, भूषण, मंजू देवी आणि क्रांती देवी यांच्यातील राजकीय संघर्षामुळे गावात गोंधळाचे वातावरण निर्माण होणार आहे. प्रचाराच्या घोषणा, रणनीती आणि अनपेक्षित वळणांनी भरलेली ही कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवणार आहे.

Panchayat Season 4
Hania Amir: पाकिस्तानी एक्ट्रेसचे व्हिडिओ पाहण्यासाठी भारतीय फॅन्सकडून व्हीपीएनची खरेदी; अभिनेत्री म्हणाली....

'पंचायत' सीरीजने 2020 मध्ये आपल्या पहिल्या सिझनपासूनच प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवले आहे. जितेंद्र कुमार, नीना गुप्ता, रघुबीर यादव, चंदन रॉय, दुर्गेश कुमार, अशोक पाठक, फैसल मलिक, सुनीता रजवार आणि पंकज झा यांसारख्या कलाकारांनी आपल्या अभिनयाने या सीरीजला यशस्वी बनवले आहे. या सिझनची कथा चंदन कुमार यांनी लिहिली असून, दिग्दर्शन दीपक कुमार मिश्रा यांनी केले आहे.

Panchayat Season 4
Hania Amir: पाकिस्तानी एक्ट्रेसचे व्हिडिओ पाहण्यासाठी भारतीय फॅन्सकडून व्हीपीएनची खरेदी; अभिनेत्री म्हणाली....

'पंचायत'चा चौथा सिझन 2 जुलै 2025 रोजी Amazon Prime Video वर प्रदर्शित होणार आहे. या सिझनमध्ये फुलेरा गावातील राजकारण, सचिवजी-रिंकीची प्रेमकथा आणि गावातील मजेशीर घटनांचा समावेश असणार आहे.यामुळे प्रेक्षकांना या सिझनची उत्सुकता लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com