Dhadkan Movie Re-Release Saam Tv
मनोरंजन बातम्या

Dhadkan: अंजली, राम आणि देवची केमेस्ट्री प्रेक्षकांच्या भेटीला; 'धडकन' होणार २५ वर्षांनंतर पुन्हा रिलीज

Dhadkan Movie Re-Release: बॉलिवूडच्या २००० साली प्रदर्शित झालेल्या 'धडकन' या चित्रपटाच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त, 'धडकन' पुन्हा एकदा २३ मे २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे.

Shruti Vilas Kadam

Dhadkan Movie Re-Release: बॉलिवूडच्या २००० साली प्रदर्शित झालेल्या 'धडकन' या रोमँटिक ड्रामाने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवले होते. या चित्रपटाच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त, 'धडकन' पुन्हा एकदा २३ मे २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. या निमित्ताने अभिनेता सुनील शेट्टीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सुनील शेट्टीने 'धडकन'च्या रि-रिलीजबद्दल बोलताना सांगितले की, "धडकन पुन्हा एकदा स्वतःला जिवंत करत आहे. माझ्या मते, लोकांना या कथानकामागील सौंदर्य समजेल एका मुलीवरील प्रेम, तिच्या पालकांच्या निवडीचा स्वीकार, आणि तिच्या पती रामसोबतचे जीवन." ते पुढे म्हणाले, "आजच्या काळात, नातेसंबंध लहानसहान गोष्टींमुळे तुटतात. पण 'धडकन' आपल्याला संयम, आदर आणि त्यागावर आधारित प्रेमकथा दाखवतो.

'धडकन' चित्रपटात शिल्पा शेट्टी, अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. धर्मेश दर्शन दिग्दर्शित या चित्रपटात अंजली, देव आणि राम यांच्यातील लव्ह ट्रेंगलचे भावनिक चित्रण करण्यात आले आहे. या चित्रपटातील संगीतही विशेष लोकप्रिय ठरले होते, ज्यात 'तुम दिल की धडकन में', 'दिल ने ये कहा है दिल से' आणि 'ना ना करते' यांसारख्या गाण्यांचा समावेश होता.

'धडकन'च्या पुनःप्रदर्शनाच्या दिवशीच सुनील शेट्टी यांचा नवीन चित्रपट 'केसरी वीर: लेजेंड्स ऑफ सोमनाथ' देखील प्रदर्शित होत आहे. या ऐतिहासिक चित्रपटात ते १४व्या शतकातील योद्ध्याची भूमिका साकारत आहेत. या दोन्ही चित्रपटांच्या निमित्ताने सुनील शेट्टी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tejaswini Pandit : "दोन भाऊ महाराष्ट्रासाठी एकत्र येतायत यापेक्षा मोठं काहीच नाही", तेजस्विनी पंडित हीची भावनिक प्रतिक्रिया | VIDEO

Buldhana: क्रूरतेची परिसीमा! मुंडकं छाटलं अन् प्रायव्हेट पार्ट कापला; शेतीच्या वादातून ६० वर्षीय व्यक्तीची हत्या

Sushil Kedia: राज ठाकरेंना नडला, मनसैनिकांनी फोडला, केडियाच्या ऑफिसरवर नारळ मारले, PHOTO पाहा

Maharashtra politics : १९ वर्षांनंतर राज-उद्धव ठाकरे एकाच मंचावर, भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले दूर का गेले ते...

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT