Pankaj Tripathi: 'हेरा फेरी ३' मध्ये परेश रावलची जागा पंकज त्रिपाठी घेणार? म्हणाले, 'मी त्याच्यांसमोर काहीच...'

Pankaj Tripathi In Hera Pheri 3: बॉलिवूडमधील बहुचर्चित 'हेरा फेरी 3' चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या चित्रपटातील बाबुराव आपटे उर्फ बाबू भैय्या ही भूमिका साकारलेले परेश रावल यांनी या चित्रपटातून बाहेर पडल्याचे जाहीर केले आहे.
Pankaj Tripathi In Hera Pheri 3
Pankaj Tripathi In Hera Pheri 3Saam Tv
Published On

Pankaj Tripathi In Hera Pheri 3: बॉलिवूडमधील बहुचर्चित 'हेरा फेरी 3' चित्रपट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या चित्रपटातील बाबुराव आपटे उर्फ बाबू भैय्या ही भूमिका साकारलेले परेश रावल यांनी या चित्रपटातून बाहेर पडल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये निराशा पसरली असून, सोशल मीडियावर पंकज त्रिपाठी यांना या भूमिकेसाठी योग्य पर्याय मानले जात आहे.

पण पंकज त्रिपाठी यांनी या चर्चांवर प्रतिक्रिया देताना स्पष्टपणे सांगितले की, "मी देखील हे वाचले आणि ऐकले आहे. पण मला वाटत नाही की मी हे पात्र साकारू शकतो. परेश सर एक उत्कृष्ट अभिनेता आहेत, आणि त्यांच्या समोर मी काहीही नाही. मी त्यांचा खूप आदर करतो, आणि मला वाटत नाही की मी त्या भूमिकेसाठी योग्य व्यक्ती आहे."

Pankaj Tripathi In Hera Pheri 3
Aditi Rao Hydari: कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अदिति राव हैदरीचा पारंपरिक लूक

परेश रावल यांनी 'हेरा फेरी 3' मधून बाहेर पडण्याचे कारण स्पष्ट करताना सांगितले की, त्यांच्या निर्णयामागे कोणतेही क्रिएटीव्ह मतभेद नाहीत. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, "माझा निर्णय क्रिएटीव्ह मतभेदांमुळे नाही. मी दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा खूप आदर करतो."

Pankaj Tripathi In Hera Pheri 3
Kalam: The Missile Man of India: डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यावर आधारित बायोपिकची घोषणा; 'हा' सुपरस्टार साकारणार भूमिका

या घडामोडींमुळे 'हेरा फेरी 3' च्या भविष्यातील योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुनिल शेट्टी यांनी देखील म्हटले आहे की, "परेश रावलशिवाय 'हेरा फेरी 3' होऊ शकत नाही." असे म्हटले आहे. तर, चाहत्यांनी देखील सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करत परेश रावल यांना परत येण्याची विनंती केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com