Devmanus SAAM TV
मनोरंजन बातम्या

Devmanus : अण्णा नाईक अन् 'देवमाणूस' एकत्र; मालिकेची रिलीज डेट जाहीर, आताच नोट करा वेळ

Devmanus Serial Release Date : मराठी अभिनेता किरण गायकवाडच्या 'देवमाणूस' मालिकेची रिलीज डेट समोर आली आहे. या भागात 'देवमाणूस'सोबत अण्णा नाईक देखील पाहायला मिळणार आहेत.

Shreya Maskar

प्रेक्षक किरण गायकवाडच्या (kiran Gaikwad ) 'देवमाणूस' (Devmanus) मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहे. मालिकेच्या टीझरपासूनच चाहते मालिका कधी सुरू होणार तसेच नवीन भागात 'देवमाणूस' कोणत्या भूमिकेत पाहायला मिळणार हे जाणून घेण्यास उत्सुक आहेत. मात्र आता प्रतीक्षा संपली आहे. कारण 'देवमाणूस' मालिकेची रिलीज डेट समोर आली आहे. तसेच 'देवमाणूस' मालिकेचा हा भाग प्रेक्षकांसाठी बंपर मनोरंजनाचा असणार आहे. कारण या मालिकेत 'देवमाणूस'सोबत अण्णा नाईक देखील प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.

अण्णा नाईक

'देवमाणूस' मालिकेची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. 'देवमाणूस' मालिकेत नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. किरण गायकवाडसोबत या मालिकेत 'रात्रीस खेळ चाले' (Ratris Khel Chale) या लोकप्रिय मालिकेतील अण्णा नाईक म्हणजे ज्येष्ठ अभिनेते माधव अभ्यंकर (Madhav Abhyankar) झळकणार आहेत. त्यांची झलक नुकत्याच रिलीज झालेल्या 'देवमाणूस' मालिकेच्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. आता अण्णा नाईक आणि 'देवमाणूस' मिळून कोणता खेळ खेळणार, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

रिलीज डेट काय?

नुकताच 'देवमाणूस' मालिकेचा अजून एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये मालिकेची रिलीज डेट सांगण्यात आली आहे. बहुप्रतिक्षित 'देवमाणूस' मालिका 2 जूनपासून रात्री 10 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या व्हिडीओला एक हटके कॅप्शन देण्यात आले आहे. कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "आता मधला अध्याय रंगणार,देवमाणसाचा 'खेळ' सुरू होणार!" चाहते या मालिकेसाठी खूपच उत्सुक आहेत.

'देवमाणूस' मालिकेत किरण गायकवाड 'हिम्मतराव लेडीज टेलर' नावाने टेलरिंगचे दुकान चालवत आहे. आपल्या शिवण कौशल्याने त्याने महिलांना वेड लावले आहे. 'देवमाणूस' महिला टेलरच्या भूमिकेत दिसणार आहे. 'देवमाणूस' मालिकेचा हा तिसरा भाग आहे. पहिल्या दोन भागांना प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले. आता 'देवमाणूस'मधला अध्यायला देखील प्रेक्षकांकडून भरपूर प्रेम मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

School Closed: मोठी बातमी! ५ डिसेंबरला राज्यातील सर्व शाळा बंद राहण्याची शक्यता; कारण काय?

PF Balance Check: UAN नंबरशिवायही चेक करता येईल बॅलन्स, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Maharashtra Live News Update: अजित पवार यांची महात्मा फुले वाड्याला भेट

Hair Wash: विवाहित महिलांनी या ३ दिवशी चुकूनही केस धुवू नये? नाहीतर...

Local body Election : झेडपी, नगर पंचायतीच्या निवडणुका लांबणार? आज सुप्रीम कोर्टात फैसला होणार

SCROLL FOR NEXT