Kiran Gaikwad Wedding SAAM TV
मनोरंजन बातम्या

Kiran Gaikwad Wedding : 'देवमाणूस' अडकला लग्नबंधनात, किरण गायकवाड अन् वैष्णवी कल्याणकर यांच्या विवाह सोहळ्याचे PHOTOS

Kiran Gaikwad - Vaishnavi Kalyankar Wedding Photos : 'देवमाणूस' फेम अभिनेता किरण गायकवाड आणि अभिनेत्री वैष्णवी कल्याणकर यांचा विवाह सोहळा पार पडला आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Shreya Maskar

सध्या मराठी मनोरंजन सृष्टीत लग्नाचे वारे वाहू लागले आहेत. कलाकारांच्या घरी लगीन घाई पाहायला मिळत आहे. काल दोन कलाकारांचा लग्न सोहळा पार पडला. अभिनेता शाल्व किंजवडेकर आणि त्याची गलफ्रेंड श्रेया डफळापूरकर हे लग्नबंधनात अडकले. तर दुसरीकडे 'देवमाणूस'चा देखील लग्नसोहळा पार पडला.

'देवमाणूस' या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेला अभिनेता किरण गायकवाड (Kiran Gaikwad ) याचा १४ डिसेंबरला लग्नसोहळा पार पडला. किरणने अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरसोबत लग्नगाठ बांधली. मालिकेच्या सेटवरच किरण गायकवाड आणि वैष्णवी कल्याणकर (Vaishnavi Kalyankar) यांचे नाते जुळले. त्यांची पहिली भेट 'देवमाणूस'मालिकेच्या सेटवर झाली. यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

अलिकडेच नोव्हेंबर महिन्यात किरण गायकवाडने आपल्या प्रेमाची कबुली चाहत्यांना दिली. त्याने सोशल मीडियावर वैष्णवीसोबतचे खास फोटो शेअर केले होते. "ही आहे माझी होणारी होम मिनिस्टर! " असे कॅप्शन लिहून त्याने आपल्या नात्याचा खुलासा केला होता. सध्या चाहत्यांकडून आणि कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

किरण आणि वैष्णवीने सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाच्या प्रत्येक समारंभाचे फोटो शेअर केले आहेत. दोघेही एकत्र खूपच सुंदर दिसत आहेत. लग्नसोहळ्याला मालिकेतील अनेक कलाकार मंडळी उपस्थित होती. किरण गायकवाड आणि वैष्णवी कल्याणकर यांनी लग्नासाठी पारंपारिक लूक केला होता. किरणने पांढऱ्या रंगाची शेरवानी परिधान केली होती. तर वैष्णवीने जांभळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती. दोघेही फोटोमध्ये खूपच छान दिसत आहेत.

किरण गायकवाडच्या देवमाणूस आणि लागिरं झालं जी या दोन मालिका प्रचंड गाजल्या. 'लागिरं झालं जी' या मालिकेत किरणने खलनायकाची भूमिका साकारली होती. तर 'देवमाणूस'मध्ये डॉक्टरची भूमिका साकारली. त्याने आपल्या अभिनयाने चाहत्यांना भुरळ घातली आहे. वैष्णवी कल्याणकर देखील एक उत्तम अभिनेत्री आहे. तिने तिकळी, देवमाणूस या मालिका केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sesame Seeds: पांढरे तीळ खाण्याचे 'हे' आश्चर्यकारक फायदे महितीये का?

Maharashtra Live Update: नांदगावला धुवाधार पाऊस लेंडी नदीला पुर .रेल्वे अंडरपास 3 फूट पाण्याखाली

Maharashtra Politics : ठाकरे-शिंदे कार्यकर्ते आमनेसामने, पालकमंत्र्याच्या बैठकीत राडा; नेमकं काय झालं? VIDEO

Mumbai News : मुंबईत प्रसिद्ध बिल्डरच्या मुलीची आत्महत्या, धक्कादायक कारणही समोर

Helicopter crash : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेलं हेलिकॉप्टर कोसळलं, २ पायलटसह ५ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT