Kiran Gaikwad : देवमाणूस फेम किरण गायकवाडचा संगीत सोहळ्यातील रोमँटिक डान्स व्हायरल; पहा व्हिडीओ

Kiran Gaikwad : झी मराठी वरील ‘देवमाणूस’ आणि लगीर झालं जी या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता किरण गायकवाड लवकरच अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरबरोबर किरण लग्न बंधनात अडकणार आहे.
देवमाणूस फेम किरण गायकवाडचा संगीत सोहळ्यातील रोमँटिक डान्स व्हायरल; पहा व्हिडीओ
kiran gaikwad sangeet ceremonyInstagram
Published On

Kiran Gaikwad : झी मराठी वरील ‘देवमाणूस’ आणि लगीर झालं जी या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता किरण गायकवाड लवकरच अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरबरोबर किरण लग्न बंधनात अडकणार आहे. किरण आणि वैष्णवीने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ते लग्न करत असल्याची घोषणा केली. त्यानंतर त्यांच्या लग्न समारंभांना सुरुवात झाली नुकतीच किरण आणि वैष्णवीला हळद लागली असून आता त्यानंतर संगीत सोहळा पार पडला. या त्यांच्या संगीत सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

अभिनेता किरण गायकवाडने २९ नोव्हेंबरला अभिनेत्री वैष्णवी कल्याणकरबरोबर फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली. “ही आहे माझी होणारी ‘होम मिनिस्टर’” असे कॅप्शन त्याने या पोस्टसोबत शेअर केले होते. किरण गायकवाडच्या या पोस्टमुळे चाहत्यांना सुखद धक्का बसला होता. त्यानंतर किरण आणि वैष्णवीने त्यांच्या लग्नाची तारीख जाहीर केली. १४ डिसेंबरला म्हणजेच आज दोघं लग्न बंधनात अडकणार आहेत. त्यापूर्वी दोघांनी त्यांच्या संगीत सोहळ्यातील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

शुक्रवारी किरण आणि वैष्णवीचा हळदी समारंभ पार पडला त्यानंतर झालेल्या संगीत सोहळ्यात किरण आणि वैष्णवीचे मराठी आणि हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध गाण्यांवर रोमँटिक डान्स सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष्यच्या ‘रांझना हुआ मैं तेरा’ या लोकप्रिय गाण्यावर दोघांनी डान्स केला. तसंच ‘नखरेवाली’ या गाण्यावर किरण आणि वैष्णवी थिरकले. किरणने या डान्सची रिल त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

देवमाणूस फेम किरण गायकवाडचा संगीत सोहळ्यातील रोमँटिक डान्स व्हायरल; पहा व्हिडीओ
Radhika Apte : राधिका आपटेने दिला गोंडस बाळाला जन्म ; ब्रेस्टफीडींग करतानाचा फोटो व्हायरल

दरम्यान, किरण गायकवाड आणि वैष्णवी कल्याणकर यांची पहिली भेट ‘देवमाणूस या मालिकेच्या सेटवर झाली आणि इथे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांच्या कामाबद्दल बोलायचे तर, किरण सध्या नाद, चौक , डंका आधी चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिकेत पाहायला मिळाला आहे. तर वैष्णवी ‘सन मराठी’ वाहिनीच्या ‘तिकळी’ नावाच्या मालिकेत दिसत आहे. या मालिकेत तिने नली ही प्रमुख भूमिका साकारली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com