Delhi Police Shared Panchayat 3 Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Delhi Police Shared Panchayat 3 Video : "शाब्बास! सचिवजी, तुम्ही...", पंचायत सीरिजमधील सीन शेअर करत दिल्ली पोलिसांनी केली अनोखी जनजागृती; Video Viral

Panchayat 3 Web Series : ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवरील 'पंचायत ३' वेबसीरीजची जोरदार चर्चा सुरू आहे. सीरीजमधील एक सीन शेअर करत दिल्ली पोलिसांनी नागरिकांमध्ये जनजागृती केली आहे.

Chetan Bodke

सध्या ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवरील 'पंचायत ३' वेबसीरीजची जोरदार चर्चा सुरू आहे. या वेबसीरीजला चाहत्यांकडून दमदार प्रतिसाद मिळत आहे. अशातच या सीरीजमधला एक सीन शेअर करत दिल्ली पोलिसांनी नागरिकांना दारु पिऊन ड्रायव्हिंग न करण्याचा सल्ला दिला आहे. अशातच या वेबसीरीजची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

सीरीजमधील एक सीन शेअर करताना पोलिसांनी नागरिकांना दारु पिऊन ड्रायव्हिंग न करण्याचा सल्ला दिला आहे. कॅप्शन दिले की, "शाब्बास! सचिव जी... तुम्ही खूप चांगलं काम करत आहात." आणि पुढे #DrinkAndDrive आणि #Panchayat असे दोन टॅग्स दिलेले आहेत. हा व्हिडीओ पाहून अभिनेता जितेंद्र कुमारच्या अभिनयाचे कौतुक चाहत्यांसह दिल्ली पोलिसही करीत आहेत.

या व्हिडीओमध्ये, सचिवच्या (जितेंद्र कुमार) समोर प्रल्हाद (फैजल मलिक) आणि आणखी एक व्यक्ती उभा असतो.. सचिव यांना काही इमरजेन्सी असते. त्यामुळे त्याला फकौली मार्केटमध्ये जायचं असतं. तर सचिव प्रल्हाद आणि त्या व्यक्तीला तुम्ही माझ्यासोबत येणार का ? असं विचारतात. तो समोरचा व्यक्ती सचिवला बोलतो, गाडी चालवेल पण, थोडा नशेत आहे. तर प्रल्हाद चा म्हणतात द्या गाडीची चावी, मी ड्रायव्हिंग करतो. पण सचिव त्याला ही गाडी चालवण्यासाठी नकार देतो. कारण, तोही नशेत असतो. शेवटी सचिवच ड्रायव्हिंग करतात. या सीनचं सध्या सर्वत्र कौतुक होत असून जितेंद्र कुमार आणि फैजल मलिकच्या अभिनयाचं कौतुक केले जात आहे.

या व्हिडीओवर नेटकऱ्यांना खूप चांगल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. "बिनोद पाहिलंस का, कशाप्रकारे जनजागृती कशी केली जात आहे.", "दिल्ली पोलिसांनीही पंचायत वेबसीरीज खूप पटापट पाहिली आहे.", "नो ड्रिंक नो ड्राईव्ह मोहीम कशी राबवली जात हे पाहिलं का बिनोद" सह अशा अनेक मिश्किल कमेंट्स नेटकऱ्यांनी केलेल्या आहेत. एक लाखांहून अधिक युजर्सने या व्हिडीओला लाईक्स केले असून लाखो युजर्सने हा व्हिडीओ पाहिलेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kantara Chapter 1: 'हा चित्रपट आणि पात्र...'; ऋषभ शेट्टीने सांगितलं 'या' कारणामुळे 'कांतारा' ब्लॉकबस्टर होऊ शकला

वर्गात कुणी नव्हतं, महिलेसोबत 'नको त्या अवस्थेत' शिक्षकाला पकडलं, विद्यार्थ्यांनी व्हिडिओ शूट करून केला व्हायरल

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट! कधीपर्यंत लागू होणार? वाचा सविस्तर

Bachchu Kadu : समाज कल्याणचा निधी लाडक्या बहिणीकडे वळवला; बच्चू कडू यांची सरकारवर जोरदार टीका

Diwali Rangoli : यंदा दिवाळीला काढा फुलांची रांगोळी, घर दिसेल सुंदर अन् लोक करतील भरपूर कौतुक

SCROLL FOR NEXT