Piyush Pal Accident Saam Tv
मनोरंजन बातम्या

Piyush Pal Accident: तरूण चित्रपट निर्मात्याचा अपघाती मृत्यू; जखमी अवस्थेत रस्त्यावर अर्धा तास तडफडत होता, लोक VIDEO शूट करत होते

Delhi Filmmaker Accident: अपघातानंतर पीयूष पाल अर्धा तास रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यामध्ये तडफडत राहिला.

Priya More

Delhi Accident:

सोशल मीडियावर लाईक आणि फॉलोअर्स वाढवण्याच्या नादामध्ये माणसाचे मन दगड होत चालले आहे. कोणतीही घटना असली तरी देखील मदत करण्याऐवजी ते आपल्या मोबाइलमध्ये व्हिडीओ शूट करण्यामध्ये दंग होतात. असाच काहीसा प्रकार दिल्लीतील फिल्ममेकर पीयूष पालसोबत घडला आहे.

अपघातानंतर पीयूष पाल अर्धा तास रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यामध्ये तडफडत राहिला. पण त्याच्या मदतीसाठी कोणीच धावून आले नाही. सर्वजण आपल्या मोबाईलमध्ये व्हिडीओ शूट करत राहिले. अशामध्ये तडफडूनच पियूषचा मृत्यू झाला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, 30 वर्षीय पीयूष पालचा दिल्लीमध्ये अपघात झाला. पेट्रोल पंपाच्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली. आपल्या बाइकवरून पीयूष दक्षिण दिल्लीतील पंचशील एन्क्लेव्हजवळील ट्रॅफिक सिग्नलवर लेन बदलत होता. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या दुसऱ्या बाइकने त्याला जोरदार धडक दिली. या अपघातानंतर पीयूष आपल्या बाइकसह लांबपर्यंत खरचटत गेला. हा अपघात इतका भीषण होता की पीयूष गंभीर जखमी झाला होता.

पीयूष रस्त्यावरच अर्धातास रक्ताच्या थारोळ्यात पडून राहिला. पण त्याच्या मदतीसाठी कोणीच धावून आले नाही. या रस्त्यावरून जाणारे नागरिक जखमी पीयूषचे फोटो आणि व्हिडीओ काढण्यात दंग राहिले. पण एकही जण पुढे येऊन पीयूषला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला नाही. त्यानंतर त्याठिकाणी आलेल्या एका व्यक्तीने पीयूषला रुग्णालयामध्ये दाखल करण्यासाठी नेले. पण तोपर्यंत खूपच उशीर झाला होता. या अपघातामध्ये पीयूषचा मृत्यू झाला. बुधवारी रात्री ९.४५ च्या सुमारास हा अपघात झाला आणि पियुषला ११ वाजता वैद्यकीय मदत मिळाली. पीयूषला योग्यवेळी मदत मिळाली असती तर त्याचा जीव वाचला असता.

पियुषच्या एका मित्राने माध्यमांशी बोलताना सांगितले की, तो गुरुग्राममध्ये स्वतंत्र चित्रपट निर्माता म्हणून काम करत होता आणि दक्षिण दिल्लीतील कालकाजी येथे राहत होता. अपघातानंतर पीयूष 30 मिनिटे रस्त्यावर तडफडत राहिला. पण रस्त्याने जाणाऱ्यांनी मदत केली नाही. कोणीतरी वेळीच मदत केली असती तर आज पीयुष जिवंत असता. पीयुषचा मोबाईल आणि डॉक्युमेंट्रीच्या शूटिंगसाठी असलेला ग्रो-पो कॅमेराही चोरीला गेल्याचे त्यांनी सांगितले. सध्या सोशल मीडियावर ही न्यूज व्हायरल होत आहे. या घटनेनंतर संताप व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT