Famous Model Death  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Famous Model Death : फॅशन इंडस्ट्रीत खळबळ! फोटोशूट करताना काळाने घात केला, प्रसिद्ध मॉडेलचा बुडून दुर्दैवी मृत्यू

Famous Model Passes Away : प्रसिद्ध मॉडेलचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. वयाच्या फक्त २६ व्या वर्षी मॉडेलने अखेरचा श्वास घेतला. नेमकं घडलं काय, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

प्रसिद्ध मॉडेलचा बुडून मृत्यू

मॉडेलने २६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मॉडेल एका ओसाड खाणीत फॅशन फोटोशूट करत होता

मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मॉडेलचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. केरळमधील एका ओसाड खाणीत फॅशन फोटोशूट सुरू असताना, दिल्लीचा मॉडेल दिव्यांशू जोशी याचा बुडून मृत्यू झाला. २८ मे २०२६ रोजी एर्नाकुलम जिल्ह्यात ही घटना घडली. मॉडेल दिव्यांशू जोशीने २६ वर्षी अखेरचा श्वास घेतला.

mintच्या वृत्तानुसार, दिव्यांशू हा केवळ एक मॉडेलच नव्हता, तर तो डिझायनर कार्तिक कुमरा यांनी स्थापन केलेल्या 'कार्तिक रिसर्च' या हस्तकला-आधारित कपड्यांच्या ब्रँडच्या दिल्लीतील किरकोळ विक्री केंद्राचे व्यवस्थापनही पाहत होता. दिव्यांशू या ब्रँडशी संबंधित एका फोटोशूटसाठी केरळला गेला होता. ही घटना पेरुंबावूर जवळच्या मुडाकुझा येथील पाण्याने भरलेल्या एका खाणीत घडली. ही खाण गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून वापरात नव्हती आणि स्थानिक पातळीवर ती एक धोकादायक जागा म्हणून ओळखली जात होती.

प्रशासकीय अधिकारी आणि स्थानिक पंचायत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा परिसर प्रतिबंधित करण्यात आला होता आणि त्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी किंवा फोटोशूट करण्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. कोडनाड पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी सांगितले की, दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये कोची येथील 'रबरबँड प्रॉडक्शन्स'च्या राजीव नीलाकांतन यांचे नाव नमूद करण्यात आले आहे. या प्रॉडक्शन हाऊसलाच दिल्लीस्थित फॅशन ब्रँडने या कामासाठी कंत्राट दिले होते. स्थानिक पंचायत अध्यक्षा शिमी वर्गीस आणि नीलाकांतन यांनीही या गोष्टीला दुजोरा दिला आहे की, खाणीमध्ये प्रवेश करण्यासाठी किंवा तिथे फोटोशूट करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रशासकीय परवानग्या घेण्यात आल्या नव्हत्या.

या घटनेनंतर आता फॅशन फोटोशूटमधील सुरक्षा मानकांविषयी, विशेषतः जेव्हा मॉडेल आणि संपूर्ण टीमला बाहेरच्या धोकादायक ठिकाणी नेले जाते, तेव्हा पाळल्या जाणाऱ्या सुरक्षा नियमांबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. दिव्यांशू जोशीचा मृतदेह पाण्याखाली सुमारे ३० फूट खोल भागातून बाहेर काढला. या घटनेमुळे फॅशन इंडस्ट्री हादरली आहे. तसेच मॉडेलच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 'कार्तिक रिसर्च' ने पोस्ट शेअर करून मॉडेलवर श्रद्धांजली वाहिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

End of life symptoms: अचानक ही ६ लक्षणं दिसली तर समजा मृत्यू जवळ आलाय!

Shocking : बीड हादरलं! २० वर्षीय नवविवाहितेची आत्महत्या; कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक कारण

आनंदवार्ता! अखेर मान्सून केरळमध्ये धडकला, महाराष्ट्रात कधी पोहचणार? तारखा आतच नोट करा

Maharashtra News Live Update: छेडछाडीचा जाब विचारणाऱ्या तरुणाची निर्घृण हत्या; अमरावतीत खळबळ

World Environment Day: जागतिक पर्यावरण दिनाची यंदाच्या वर्षीची थीम काय आहे?

SCROLL FOR NEXT