Shruti Vilas Kadam
रात्रीच पुढच्या दिवसासाठी कपडे निवडून ठेवा. कॉटन कुर्ता सेट, फॉर्मल टॉप-पँट किंवा को-ऑर्ड सेट असे पर्याय ठेवल्यास सकाळी वेळ वाचतो.
फाउंडेशनऐवजी BB/CC क्रीम, काजळ, मस्कारा आणि हलकी लिपस्टिक वापरा. २-३ मिनिटांत फ्रेश आणि प्रोफेशनल लूक तयार होतो.
लो बन, पोनीटेल किंवा स्लीक ओपन हेअर अशा झटपट हेअरस्टाइल्स निवडा. जास्त स्टायलिंग टाळा आणि केस व्यवस्थित दिसतील यावर भर द्या.
बेसिक रंग (ब्लॅक, व्हाइट, बेज) असलेले कपडे ठेवा, जे सहज एकमेकांसोबत मॅच होतात. त्यामुळे निर्णय घेण्याचा वेळ कमी लागतो.
साधे इयररिंग्स, घड्याळ आणि एक स्लीक बॅग पुरेशी असते. जास्त अॅक्सेसरीज वेळ घेतात आणि लूक ओव्हर होऊ शकतो.
कम्फर्टेबल फ्लॅट्स, लो हील्स किंवा लोफर्स निवडा. हे लवकर घालता येतात आणि दिवसभर आरामदायकही असतात.
पर्समध्ये कंगवा, लिप बाम, कॉम्पॅक्ट आणि परफ्यूम ठेवा. ऑफिसला पोहोचल्यावर १ मिनिटात टच-अप करून लूक अधिक फ्रेश करता येतो.