Manasvi Choudhary
मनोरंजन विश्वातील ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर ही जोडी सर्वांनाच माहित आहे.
कायमच आपल्या हटके स्टाईल नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेणारे हे कपल आता पुन्हा चर्चेत आले आहे.
अभिनेत्री ऐश्वर्या नारकरने काही खास फोटो शेअर केले आहेत. अत्यंत साध्या लूकमध्ये त्यांनी हे फोटोशूट क्लिक केलं आहे.
चिकनकरी कुर्ती, केसांत गजरा आणि ज्वेलरी असा ऐश्वर्या नारकरचा सुंदर लूक आहे. पती अविनाश सोबत तिने फोटोशूट केलं आहे.
निसर्गाच्या सानिध्यात खास वेळ घालवत त्यांनी हे फोटोशूट केलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
चाहत्यांना देखील या कपलचे फोटो आवडले आहेत. नेटकऱ्यांनी फोटोंवर तुफान लाईक्स केले आहेत.
या फोटोशूटमध्ये तुम्ही पाहू शकता, दोघांच्याही गालावर हसू उमललं आहे. सोशल मीडियावर ऐश्वर्या आणि अविनाश यांचे फोटो व्हायरल झाले आहेत.