De De Pyaar De 2 Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

De De Pyaar De 2 Collection : अजय देवगणचा 'दे दे प्यार दे 2' सिनेमा 50 कोटींच्या उंबरठ्यावर, मंगळवारी कमाई किती?

De De Pyaar De 2 Box Office Collection Day 5 : अजय देवगणचा 'दे दे प्यार दे 2' सिनेमा हाऊसफुल पाहायला मिळत आहे. चित्रपट लवकरच 50 कोटींचा टप्पा ओलांडणार आहे.

Shreya Maskar

'दे दे प्यार दे 2' सिनेमा 14 नोव्हेंबर 2025 ला थिएटरमध्ये रिलीज झाला.

'दे दे प्यार दे 2' लवकरच 50 कोटींचा टप्पा ओलांडणार आहे.

'दे दे प्यार दे 2' चित्रपट रोमँटिक-कॉमेडी ड्रामा आहे.

'दे दे प्यार दे 2' (De De Pyaar De 2) चित्रपट 2019 साली रिलीज झालेल्या 'दे दे प्यार दे' सिनेमाचा सीक्वल आहे. 'दे दे प्यार दे 2' सिनेमा 14 नोव्हेंबर 2025 ला रिलीज झाला. 'दे दे प्यार दे 2' हा रोमँटिक-कॉमेडी आहे. चित्रपट 50 कोटींचा टप्पा लवकरच पार करणार आहे. 'दे दे प्यार दे 2' मध्ये आर. माधवन, अजय देवगण, रकुल, गौतमी कपूर, जावेद जाफरी, मीजान जाफरी, इशिता दत्ता आणि जानकी बोडीवाला हे कलाकार झळकले आहेत.

'दे दे प्यार दे 2' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 5

Sacnilk च्या रिपोर्टनुसारनुसार, 'दे दे प्यार दे 2' चित्रपटाने पाचव्या दिवशी सोमवारी 5.00 कोटी रुपये कमावले आहेत. पाच दिवसांत सिनेमाने एकूण 44.00 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. 'दे दे प्यार दे 2' आता 50 कोटींच्या उंबरठ्यावर आहे.

  • पहिला दिवस - 8.75 कोटी रुपये

  • दुसरा दिवस - 12.25 कोटी रुपये

  • तिसरा दिवस - 13.75 कोटी रुपये

  • चौथा दिवस - 4.25 कोटी रुपये

  • पाचवा दिवस - 5.00 कोटी रुपये

  • एकूण - 44.00 कोटी रुपये

'दे दे प्यार दे 2' वर्ल्डवाइड कलेक्शन

मीडिया रिपोर्टनुसार, 'दे दे प्यार दे 2' चित्रपटाने जगभरात 60 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. जवळपास सिनेमाने 67.75 कोटी कमावले आहेत.

चित्रपटाचे बजेट किती?

अजय देवगणच्या रोमँटिक-कॉमेडी चित्रपटाने प्री-सेल्सने एकूण 122 कोटींचा आकडा गाठला. चित्रपटाचे निर्मिती बजेट 135 कोटी रुपये आहे. तर प्रिंट्स आणि जाहिरातींवर (पी अँड ए) अतिरिक्त 15 कोटी खर्च करण्यात आला. यामुळे चित्रपटाचा एकूण खर्च 150 कोटी झाला. 150 कोटी बजेटच्या तुलनेत 'दे दे प्यार दे 2' ने 81% वसुली केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ, रेस्टॉरंटवर टाकला दरोडा

Leopard Attack : ऑपरेशन लेपर्ड! बिबट्याच्या नसबंदीसाठी वनविभागाची सर्वात मोठी मोहीम, पण 'या' आव्हानांचे काय?

Garlic Benefits: सकाळी रिकाम्या पोटी 1 लसणाची पाकळी खाल्ल्यावर हार्ट अटॅक ते डायबेटीजचा धोका टळतो, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला

Shocking: हे बाळ आमच्या मुलाचं नाही..., सासू-सासऱ्यांकडून चारित्र्यावर संशय; सुनेने ९ महिन्यांच्या मुलीला संपवलं

Black Coffee vs Milk Coffee: ब्लॅक कॉफी की मिल्क कॉफी, कोणती अधिक फायदेशीर?

SCROLL FOR NEXT