Kalyan : कल्याणमध्ये चाललंय काय? स्कायवॉकवर वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांकडून व्यक्तीला बेदम मारहाण

Kalyan News : कल्याणमध्ये गुन्हेगारी वाढू लागली आहे. आता स्कायवॉकवर वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांनी एका व्यक्तीला माराहाण केल्याची घटना घडली आहे.
Kalyan news
KalyanSaam tv
Published On
Summary

कल्याण रेल्वे स्थानकाजवळील स्कायवॉकवर व्यक्तीला वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांच्या गटाकडून बेदम मारहाण

वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांविरोधात स्थानिकांची तक्रार

मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

कल्याणमध्ये पुन्हा एकदा गुन्हेगारी डोकं वर काढू लागली आहे. सोनसाखळी चोर, अल्पवयीन तळीरामांनी उच्छाद मांडला आहे. आता यात वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची भर पडली आहे. वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांनी स्कायवॉकवर एका व्यक्तीला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या व्यक्तीला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण स्कायवॉक परिसरात काही वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला नियमितपणे वावरत असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी यापूर्वीही केली होती. संबंधित व्यक्ती आणि वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांमध्ये नेमका कोणत्या कारणावरून वाद झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र या व्यक्तीला मारहाण करतानाचा व्हिडिओ काही प्रवाशांनी मोबाईलमध्ये टिपून सोशल मीडियावर शेअर केला.

Kalyan news
ऑफिसमध्ये लाइट बंद करण्यावरून वाद पेटला; सहकारी कर्मचाऱ्याने डंबल फेकून मारला, ४१ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

व्हिडिओमध्ये वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला त्या व्यक्तीला कानशीलात लगावत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या प्रकरणाचा तपास कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यांकडून सुरू करण्यात आला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा स्कायवॉकवरील असुरक्षिततेचा मुद्दा समोर आला आहे.

Kalyan news
Tragic Accident : देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला; भरधाव टूरिस्ट बसची ट्रकला धडक, १८ भाविकांचा मृत्यू

कल्याणमध्ये कोयता गँगचा उच्छाद

कल्याणमध्ये शनिवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत दोन तरुणांनी हातात कोयता घेऊन धिंगाणा घातल्याची धक्कादायक घटना घडली. टपरी चालकाने सिगारेट ओढण्यासाठी माचिस देण्यास नकार दिला. त्यानंतर संतापलेल्या दोघांनी कोयता दाखवून परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com