Dashavatar Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Dashavatar Collection : बॉक्स ऑफिसवर 'दशावतार'चा बोलबाला; दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयानं केली जादू, २ दिवसांत कमावले तब्बल 'इतके' कोटी

Dashavatar Box Office Collection Day 2 : बॉक्स ऑफिसवर ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या 'दशावतार' चित्रपटाचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. सिनेमाने दोन दिवसांत किती कोटी कमावले, जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'दशावतार' चित्रपट 12 सप्टेंबरला रिलीज झाला.

'दशावतार' चित्रपटात मुख्य भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर झळकले आहेत.

'दशावतार' चित्रपटाचे दिग्दर्शक सुबोध खानोलकर आहेत.

सध्या बॉक्स ऑफिसवर तीन मराठी चित्रपट आले आहेत. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar ) यांच्या 'दशावतार' (Dashavatar) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 'दशावतार' चित्रपट 12 सप्टेंबरला रिलीज झाला. याच दिवशी आणखी दोन चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला आले. यात ललित प्रभाकर आणि हृता दुर्गुळे यांचा 'आरपार' चित्रपट तर मराठी इंडस्ट्रीतील क्युट कपल प्रिया बापट आणि उमेश कामत यांचा 'बिन लग्नाची गोष्ट' सिनेमाचा समावेश आहे. '

'दशावतार' रिलीज झाल्यापासून सर्वत्र दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाचे कौतुक होताना दिसत आहे. तसेच चित्रपटाची कथा प्रेक्षकांना खूप आवडली आहे. सिनेमाबाबत अनेक सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. 'दशावतार' ही कोकणातील एक परंपरा, लोककला आहे. जत्रांमध्ये दशावताराचे शो पाहायला मिळतात. दशावतार' चित्रपटाने दोन दिवसांत किती कोटींचा गल्ला (Box Office Collection) जमावला जाणून घेऊयात.

'दशावतार' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 2

दिलीप प्रभावळकर यांचा 'दशावतार' चित्रपट बॉक्स ऑफिस गाजवत आहे. या चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत कोटींचा व्यवसाय केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'दशावतार' चित्रपटाने पहिल्या दिवशी 58 लाखांची कमाई केली आहे. तर दुसऱ्या दिवशी शनिवारी तब्बल 1.39 कोटी रुपये कमावले आहेत. शनिवारी 'दशावतार'च्या कलेक्शनमध्ये तुफान वाढ झाली आहे. आतापर्यंत चित्रपटाने भारतात 1.97 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

'दशावतार' स्टार कास्ट

'दशावतार' चित्रपटाचे दिग्दर्शक सुबोध खानोलकर आहेत. 'दशावतार' चित्रपटात मुख्य भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर झळकले आहेत. तसेच या चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळत आहे. यात महेश मांजरेकर, भरत जाधव, प्रियदर्शनी इंदलकर, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, आरती वडगबाळकर, रवी काळे, सुनील तावडे आणि विजय केंकरे हे कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : भाजप नेता Live डिबेटमध्ये पायजामा न घालताच बसले, व्हिडिओचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Manoj Jarange: ४० चोर घेऊन येवल्याचा आली बाबा लय बोलतो, मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर प्रहार|VIDEO

Aabeer Gulaal: पाकिस्तानी अभिनेत्याचा चित्रपट भारतात होणार प्रदर्शित? वाचा महत्वाची अपडेट

नेपाळचा राष्ट्रीय पक्षी कोणता? उत्तर ऐकून थक्क व्हाल

महामार्गावर भयंकर घडलं, कंटेनरचा ब्रेक फेल, ९ चारचाकींना उडवलं; घटना CCTVत कैद

SCROLL FOR NEXT