Zaira Wasim Father Passes Away Saam Tv
मनोरंजन बातम्या

Zaira Wasim: 'मी वडिलांना गमावलंय...;'दंगल' फेम अभिनेत्री झायरा वसीमला पितृशोक; इन्स्टाग्रावर शेअर केली भावुक पोस्ट

Zaira Wasim Father Passes Away: दंगल फेम अभिनेत्री झायरा वझीमच्या वडिलांचे दुःखद निधन झाले आहे. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती शेअर केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

'दंगल' फेम अभिनेत्री झायरा वसीमला (Zaira Wasim) पितृशोक झाला आहे. झायराच्या वडिलांचे निधन झाले आहे. झायराने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती चाहत्यांना दिली आहे.

झायरा खानने दंगल चित्रपटात आमिर खानच्या मुलीची भूमिका साकारली होती. या चित्रपटामुळे ती प्रसिद्धीझोतात आली होती. यानंतर तिने अनेक चित्रपटात काम केले. काही दिवसांपूर्वीच तिने चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला होता. झायराच्या वडिलांच्या अचानक जाण्याने झायरा आणि तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

झायराने सोशल मीडियावरुन ही माहिती शेअर केली आहे. वडिलांसोबतचा फोटो झायराने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यावर तिने 'माझे वडील जाहिद वसीम यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांना तुमच्या प्रार्थनेत कायम लक्षात ठेवा. अल्लाह त्यांच्या सर्व चुका माफ करेन. त्यांना सर्व दुःखापासून वाचव. त्यांचा पुढचा प्रवास सोपा करेल. त्यांना लवकर बोलावले आहे. त्यांना जन्नतमध्ये सर्वोच्च जागा दिली जाईल. आपण सर्वजण अल्लाहचेच आहोत', असं कॅप्शन तिने लिहलं आहे.

झायराबद्दल बोलायचे झाले तर, झायरा ही जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये राहते. तिने 'दंगल' (Dangal)चित्रपटात गीता फोगट यांची लहानपणीची भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने टद स्काय इज पिंक (The Sky Is Pink), 'सिक्रेट सुपरस्टार' (Secret Superstar) या चित्रपटात काम केले होते. झायराने सध्या चित्रपटसृष्टीपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Online Tenancy Agreements : भाडेकराराची नोंदणी ऑनलाइनच, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Jamnagar Tragedy : गणेश मूर्तीचं विसर्जन करताना पाण्याचा अंदाज चुकला; एकाच कुटुंबातील तिघांचा बुडून मृत्यू

Maharashtra Government: राज्य सरकार मोठे निर्णय घेणार! ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नवी पात्रता लागू

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा धसका? मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

Manoj Jarange Patil: भगवे रुमाल, टोप्या घालून ४०-५० पोलीस आंदोलनात शिरलेत; जरांगेंचा मोठा आरोप

SCROLL FOR NEXT